पुस्तक प्रेमींना प्रतिक्षा ‘आदान-प्रदान’ महोत्सवाची
मुंबई – स्व. दिना बामा पाटील वाचनालय आणि अभ्यासिका यांच्यावतीने ‘पुस्तक आदान-प्रदान महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ६ ते ८ डिसेंबर दरम्यान सायंकाळी ४ ते रात्री 10 वाजेपर्यत हा महोत्सव दिना बामा पाटील ईस्टेट, भांडुप पश्चिम येथे आयोजित करण्यात येणार आहे. वाचलेले पुस्तक दान करा आणि आपल्याला आवडेल ते पुस्तक घेऊन जा, अगदी मोफत. अशी पुस्तक आदान- प्रदानची संकल्पना आहे.
स्व. दिना बामा पाटील यांच्या जयंती निमित्त भांडुप स्टेशन जवळ भव्य असे पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आजच्या डिजीटल, व्हॉट्अप युगात ही पुस्तकांचे संग्रह करणा-या पुस्तक प्रेमींनी या प्रदर्शनाला भेट देऊन लाखो रुपयांची पुस्तके खरेदी केली आहेत. हे प्रदर्शन 8 डिसेंबर पर्यंत चालू राहणार आहे. त्याच बरोबर ६ ते ८ डिसेंबर दरम्यान पुस्तकांचे आदान-प्रदान होणार असून सर्व प्रकारच्या वाचक प्रेमींसाठी ही एक दिवाळी भेट असणार आहे. या ठिकाणी तुम्ही वाचलेली पुस्तके दान करुन तुम्हांला आवडेल ते पुस्तक तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता ते देखील अगदी मोफत. हा महोत्सव ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कार्यालयाच्या आवारात भरविण्यात येणार आहे. तर स्व. दिना बामा पाटील वाचनालय आणि अभ्यासिका यांच्या वतीने पुस्तकांचे आदान-प्रदान महोत्सव आयोजन करण्यात येणार आहे. युवासेना कार्यकारणी सदस्य आणि वाचनालयाच्या सचिव राजोल संजय पाटील यांच्या पुढाकाराने या महात्सवाचे तसेच पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
