Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

ओप्पो तर्फे ओप्पो फाईंड एक्स ८ सिरीज भारतात लॉन्च

पुणे   : ओप्पो इंडियाने आज भारतात आपली ओप्पो फाईंड एक्स ८ सिरीज लॉन्च केली. ओप्पोची इनोव्हेशनची परंपरा पुढे नेणाऱ्या या फाईंड एक्स ८ सिरीजमध्ये आहे मीडियाटेक डायमेन्सिटी ९४०० एसओसी , दोन टेलीफोटो स्नॅपर्ससह एक नावीन्यपूर्ण क्वाड कॅमेरा सिस्टम, एक उच्च-डेन्सिटीची झटपट चार्ज होणारी सिलिकॉन कार्बाइड बॅटरी आणि फोटोग्राफी व उत्पादकतेसाठी अनेक एआय फीचर्ससह कलर ओएस १५ हे सर्व काही एका आय पी ६८ आणि आयपी ६९-रेटेड टिकाऊ तरीही वजनात हलक्या डिव्हाईसमध्ये आहे .

या सिरीजमध्ये रु. ९९,९९९ किंमतीचा १६ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज असलेला फाईंड एक्स ८ प्रो, आणि दोन स्टोरेज प्रकारांचे स्टँडर्ड फाईंड एक्स ८ फोन सामील आहेत. स्टँडर्ड फाईंड एक्स ८ मधल्या एका प्रकारात रु. ६९,९९९ किंमतीचा १२ जीबी + २५६ जीबी असलेला आणि रु. ७९,९९९ किंमतीचा १६ जीबी +५१२ जीबीचा फोन आहे. हे सर्व डिव्हाईस ३ डिसेंबरपासून ओप्पो ई-स्टोअर, फ्लिपकार्टवर तसेच प्रमुख रिटेल दुकानांत उपलब्ध होतील.

ओप्पोचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य उत्पादन अधिकारी पीट लाऊ ( Pete Lau, )म्हणाले की , “फाईंड एक्स ८ सिरीज द्वारे ओप्पो ने दाखवून दिले आहे की, स्मार्टफोन काय साध्य करू शकतात. फाईंड एक्स ८ आणि फाईंड एक्स ८ प्रो P मध्ये शालीनता आणि आधुनिक इंजिनियरिंगचे मिश्रण केले आहे. त्यामुळे यातील कॅमेरा अल्ट्रा ग्रेडचे आहेत आणि ते व्यावसायिक स्तराच्या फोटोग्राफीसाठी उपयुक्त आहेत. त्याच्या प्रदीर्घ बॅटरी लाइफमुळे अविरतपणे फोनचा वापर करता येतो आणि काही आव्हानात्मक कामे सहजपणे हाताळण्यासाठी त्याचा अल्ट्रा पॉवरफुल परफॉर्मन्स कामास येतो. ही इनोव्हेशन्स एकत्र मिळून फाईंड एक्स ८ सिरीजला स्मार्टफोन उत्कृष्टतेचा जागतिक मापदंड म्हणून स्थापित करतात आणि यूझर्स आपल्या डिव्हाईसकडून काय काय अपेक्षा करू शकतात याचे उच्च मानक नक्की करतात.”

फाईंड एक्स ८ प्रमुख सिरीजमध्ये ड्युअल टेलीफोटो कॅमेऱ्यांसह क्वाड-कॅमेरा सिस्टम आहे. प्रो मॉडेलमध्ये एलवायटी ८०८ प्रायमरी सेन्सर आहे, नावीन्यपूर्ण ट्रिपल प्रिझम लेन्स आर्किटेक्चरसह एक ५० एमपी एल वाय टी ८०८ ३ एक्स टेलीफोटो सेन्सर आहे. एआय समर्थित टेलिस्कोप झूम फीचर १२० एक्स पर्यंत सहज झूम करते. जनरेटिव्ह एआय चा उपयोग करून ही सिस्टम वेगवेगळ्या झूम स्तरांवर चतुरपणे तपशील सुधारते त्यामुळे लॉन्ग-डिस्टन्स फोटोग्राफी सहज आणि नेमकी होते.

फाईंड एक्स ८ प्रो मध्ये असलेला एआय फोटो रिमास्टर सूट या सिरीजच्या अभूतपूर्व क्वाड-कॅमेरा सिस्टमसह अगदी सुरळीत काम करतो. त्यांच्या या समन्वयामुळे यूझर्स त्यांचे फोटो सहजपणे सुधारू शकतात, कमी रिझॉल्यूशन असलेली चित्रे स्पष्ट, शार्प करण्यापासून ते नको असलेली प्रतिबिंबे काढून टाकण्यापर्यंत सर्व काही शक्य होते. सुंदर लँडस्केप टिपणे असो किंवा पोर्ट्रेटमध्ये अचूकता आणायची असो कलर ओएस १५ खातरजमा करतो की प्रत्येक फोटोमध्ये कॅमेऱ्याची अस्सल क्षमता दिसेल.फाईंड एक्स ८ सिरीजच्या उन्नत आर्किटेक्चरवर सुरळीतपणे चालण्यासाठी एआय टूलबॉक्स सारखी उत्पादकता टूल्स इष्टतम करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading