रामोजी ग्रुपने सुरू केले सबला मिलेट्स
श्री. रामोजी राव गारू यांच्या 88 व्या जन्म जयंतीच्या निमित्ताने रामोजी ग्रुपने ‘सबला मिलेट्स – भारताचे सुपरफुड’ ची सहर्ष सुरुवात केली आहे.
या लॉन्च प्रसंगी, सबला मिलेट्सचे संचालक सहरी चेरूकुरी म्हणाले, “सबला, मिलेट्स (भरडधान्या)ची सकसता आणि अधिक निरोगी जीवन जगण्याप्रति वचनबद्धता दर्शविते. हा उपक्रम कल्पकतेच्या मदतीने पारंपरिक भारतीय धान्ये आणि आधुनिक पाककृती यांच्यातील अंतर दूर करते. सबलामधून संतुलित पोषण आणि उत्तम स्वाद यांची सांगड घालण्याचा आमचा दृढनिर्धार दिसतो. आमचे संस्थापक श्री. रामोजी राव गारू यांच्या जन्म जयंतीच्या निमित्ताने ही मिलेट्सची श्रेणी लॉन्च करताना आम्हाला आनंद होत आहे. या श्रेणीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या निरोगी भारताचे स्वप्न बघणाऱ्या दूरदृष्टीला सलामी देत आहोत. सबला हा एक ब्रँड आहे जो अन्न सेवन पद्धतींमध्ये सकारात्मक आणि पद्धतशीर बदल घडवून आणण्यासाठी, संतुलित पोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शाश्वत भविष्याला पाठिंबा देण्यासाठी समर्पित असेल”
हा उपक्रम म्हणजे या समूहाने उपभोक्त्याच्या आरोग्याप्रतिच्या वचनबद्धतेच्या दिशेने उचललेले एक अनोखे पाऊल आहे. यामध्ये आधुनिक आणि आरोग्याविषयी जागरूक जीवनशैलीसाठी अनुरूप अशी मिलेट-आधारित उत्पादने, पोषकतेबाबत कोणतीही तडजोड न करता प्रदान करण्यात येत आहेत. सबला मिलेट्स आपल्या उपभोक्त्यांसाठी पोषक आणि रुचकर उत्पादनांच्या श्रेणीचा पुरस्कार करण्यासाठी वचनबद्ध आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 45 उत्पादने आणि त्यांचे प्रकार लॉन्च करण्यात आले आहेत, ज्यामध्ये भारताची अन्न-श्रेणी समृद्ध करणारे पदार्थ जसे की, विविध राज्यातील खिचडीपासून ते मिलेट-आधारित कुकीज, हेल्थ बार, मंचीज आणि नूडल्स, इ. चा समावेश आहे.
श्री. रामोजी राव गारू यांची विश्वास, गुणवत्ता आणि उत्कृष्टता ही मूल्ये आणि व्हिजन प्रदर्शित करणारे सबला मिलेट्स दर्जेदार आणि नैसर्गिक पद्धतीने मिळवलेल्या घटकांची वाढती मागणी पूर्ण करते. मिलेट्स त्यांच्या समृद्ध पोषकतेबद्दल ओळखली जातात. त्यांच्या प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे सकस आहाराचे पर्याय शोधणाऱ्या उपभोक्त्यांसाठी ती आदर्श आहेत.
या लॉन्च समारंभात आमंत्रितांना नवीन उत्पादन श्रेणी प्रत्यक्ष चाखण्याचा अनुभव देण्यात आला तसेच आणि सहरी चेरूकुरी यांच्या अकर्षक प्रेझेंटेशनचा आस्वाद घेऊन त्यांच्याशी संवाद साधता आला.
आपला आवाका वाढवण्यासाठी सबला मिलेट्सने डिजिटल अभियान देखील सुरू केले आहे, ज्याचा उद्देश उपभोक्त्यांना आकर्षित करून मिलेट्सच्या लाभांबाबत सुशिक्षित करण्याचा असून त्याच्या जोडीला दैनंदिन भोजनात त्यांचा समावेश कसा करून घेता येईल हे सुचविणाऱ्या टिप्स आणि पाककृती सादर करण्याचा आहे.
