टीच फॉर इंडियाकडून भारतात आर्ट्स फेलोशिप लाँच
टीच फॉर इंडियाच्या वर्षानुवर्षे स्पेशल प्रवास दाखवणाऱ्या अद्वितीय विशेष संगीतमय ‘विथ लव्ह’सह साजरा करत आहे १५वा वर्धापन दिन
२०३२ पर्यंत, भारतातील ३ ते ५ शहरांपर्यंत विस्तारित करण्याची आणि शैक्षणिक यंत्रणा सुधारण्यासाठी ५०,००० लीडर्ससह विद्यार्थी प्रमुख, शिक्षक, शिक्षकांचे प्रशिक्षक, शालेय प्रमुख, उद्योजक व सरकारी अधिकारी घडवण्याची योजना
टीच फॉर इंडिया या ना-नफा तत्त्वावर आधारित समान शैक्षणिक संधी देणाऱ्या संस्थेने भारतात संस्थेच्या १५व्या वर्धापन दिनाला साजरा करण्यासाठी आपल्या संगीतमय ‘विथ लव्ह’च्या विशेष प्रदर्शनामध्ये आर्ट्स फेलोशिपच्या लाँचची घोषणा केली आहे. टीच फॉर इंडिया देणाऱ्या विद्यमान दोन-वर्ष फेलोशिप प्रोग्रामव्यतिरिक्त हा दुसरा प्रोग्राम आहे. या नवीन प्रोग्रामसह टीच फॉर इंडिया मुलांना दर्जेदार शिक्षण घेण्यास अधिक सक्षम करेल आणि फेलोजना नेतृत्व विकासाच्या संधी देईल.
६ जानेवारी २०२५ पासून इच्छुक नवीन पूर्ण-वेळ देय भरलेल्या आर्ट्स फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात. हा नाविन्यपूर्ण प्रोग्राम फेलोजना भारतातील वंचित शाळांमधील विद्यार्थ्यांचा आवाज, अभिव्यक्ती व संबंधाला चालना देणाऱ्या उच्च दर्जाच्या कला सूचना देत शैक्षणिक असमानतेमधील तफावत दूर करण्यास सक्षम करेल. टीच फॉर इंडियाचे माजी विद्यार्थी, बाह्य तज्ञ आणि शिक्षणामधील कलामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अभिप्रायांनंतर आर्ट्स फेलोशिप विकसित करण्यात आली आहे.
आपल्या मिशनमध्ये अधिक वाढ करण्यासाठी टीच फॉर इंडिया २०३२ पर्यंत ३ ते ५ नवीन शहरांपर्यंत आपल्या कार्यसंचालनांना विस्तारित करत आहे. यामुळे देशभरातील ११ ते १३ शहरांमध्ये त्यांची उपस्थिती वाढेल (सध्या, टीच फॉर इंडिया अहमदाबाद, बेंगळुरु, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई व पुणे ८ शहरांमध्ये उपस्थित आहे). संस्था २०३२ पर्यंत ५०,००० लीडर्ससह शिक्षक, शिक्षकांचे प्रशिक्षक, शालेय प्रमुख, विद्यार्थी प्रमुख, सरकारी अधिकारी व उद्योजक घडवण्याप्रती कटिबद्ध आहे.
या संस्मरणीय प्रसंगी मत व्यक्त करत टीच फॉर इंडियाच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शाहीन मिस्त्री म्हणाल्या, ”आमच्यासाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे. टीच फॉर इंडियाच्या १५ वर्षांच्या प्रवासाला उजाळा देण्याचा अनुभव अत्यंत समाधानकारक आहे. १००० फेलोज आणि ५००० माजी विद्यार्थी देशभरातील ५० दशलक्ष मुलांवर प्रभाव निर्माण करण्यासह आम्ही देशातील शैक्षणिक असमानतेमधील तफावत दूर करण्यासाठी आणि लीडर्सचा देश घडवण्यासाठी अथक मेहनत घेत आहोत. नवीन आर्ट्स फेलोशिप लाँच करत आम्ही विद्यार्थ्यांना स्थानिक व जागतिक कलाप्रकारांमध्ये सामावून जाण्यास मदत करण्याची आणि त्यांच्यामध्ये कलात्मक अभिव्यक्तीप्रती प्रशंसा व अभिमान बिंबवण्याची आशा करतो, ज्यामुळे ते सर्जनशीलता, दयाळूपणा आणि सामाजिक परिवर्तनाप्रती कटिबद्धतेसह नेतृत्व करण्यास सक्षम होतील.”
