Tuesday, September 22, 2026
Latest NewsPUNE

पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला

 

  • विकासाच्या मुद्द्यावर जनता पुन्हा संधी देणार; सुनील कांबळे यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधूमाळीला सुरुवात झाली आहे. पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजप, महायुतीचे उमेदवार सुनील ज्ञानदेव कांबळे यांच्या प्रचाराचा नारळ महायुती मधील  घटक पक्षांच्या शहाराध्यक्षांच्या उपस्थितीत मंगळवारी वानवडी भागातील आझाद नगर येथील सुवर्ण गणेश मंदिरात करण्यात आला. 

यावेळी आमदार सुनील ज्ञानदेव कांबळे, भारतीय जनता पक्षाचे शाहराध्यक्ष धिरज घाटे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)  शहराध्यक्ष संजय सोनवणे, भाजप सरचिटणीस  महेश पुंडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, रिपाइं प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव,  विवेक शिंदे, स्थानिक नगरसेविका  कालिंदाताई पुंडे, नगरसेवक धनराज घोगरे, सचिन मथुरावाला,  कोमलताई शेंडकर, समीर शेंडकर, यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस, रिपाइं ,  राष्ट्रीय समाज पक्ष, लहुजी शक्ती सेना, अखिल भारतीय मराठा महासंघ, युवा स्वाभिमान पक्ष, जनसुराज्य पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), भीमशक्ती, रयत क्रांती संघटना, जनता दल सेक्युलर, जय मल्हार क्रांती संघटना, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, दलित पँथर, भीमसेना, युवा सुराज्य संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, युवा रिपब्लिकन पार्टी, लहुजी साळवे बहुजन क्रांती चे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या प्रसंगी आझादनगर येथून पदयात्रा काढण्यात आली, ही पदयात्रा  केदारी नगर,  वाघ वस्ती, कामठे गार्डन या मार्गाने महादजी शिंदे चौकात गेली व शिंदे छत्री येथे या पदयात्रेचा समारोप झाला. 

यावेळी बोलताना सुनील कांबळे म्हणाले, मागील पाच वर्षांच्या काळात या भागातील मूलभूत प्रश्नांवर काम केले आहे. या भागात वीज आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होता, तो सोडवण्यात आम्हाला यश मिळाले आहे. कोरोना काळात मूलभूत आरोग्य प्रश्न सोडवण्यात वेळ गेला यामुळे काही विकासकामे करायची राहिली आहेत आगामी काळात ती कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी लहानाचा मोठा या भागात झालो, यामुळे या भागाच्या नेमक्या समस्या काय आहेत यांची मला जाणीव आहे, विकासाच्या मुद्द्यावर जनते समोर जात आहे आणि याच मुद्द्यावर नागरिक मला पुन्हा संधी देतील हा विश्वास आहे. 

या प्रसंगी दीपक मानकर, धिरज घाटे, बाळासाहेब जानराव आदींनी मनोगत व्यक्त करत सुनील कांबळे यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading