Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

किर्तनाची जबाबदारी की मैत्रीचा तिढा? ‘इंद्रायणी’मध्ये इंदूची नवी परीक्षा

महाराष्ट्राची लाडकी मालिका ‘इंद्रायणी’ने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवले आहे. रसिकांच्या मनाला भिडणारी ही मालिका इंदूच्या संघर्षमय प्रवासाचे दर्शन घडवत आहे. जिथे एक साधी मुलगी किर्तनाची मोठी जबाबदारी पेलताना दिसत आहे. दरवेळी विठुरायाचे नामस्मरण आणि किर्तनातून भक्ती पसरवणारी इंदू, आजच्या भागात एका गंभीर द्विधेच्या उंबरठ्यावर आहे.

आधुने इंदूला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जर तिने किर्तनाला जाण्याचा निर्णय घेतला, तर त्यांच्या मैत्रीवर परिणाम होईल. या द्विधेने इंदू अस्वस्थ झाली आणि किर्तन टाळण्यासाठी व्यंकू महाराजांना तब्बेतीचे खोटे कारण दिले. परंतु, व्यंकू महाराजांनी तिला सूचित केले की विठुरायाची सेवा हेच तिचे जीवनाचे ध्येय आणि तिची जबाबदारी आहे, ज्याला कधीच विसरून चालणार नाही.

प्रेक्षकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे की इंदू या अडचणीचा सामना कसा करेल. इंदूचा संघर्ष, भक्ती आणि निष्ठेचा हा नवीन टप्पा प्रेक्षकांना भावनिक करतो आहे. इंदूने विठुरायाच्या सेवेला कसे प्राधान्य दिले, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

पाहा ‘इंद्रायणी’, संध्याकाळी ७ वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading