मुलुंड मतदारसंघात तिरंगी लढत,कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
मुंबई : राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार संगीता वाजे यांनी आज मुलुंड मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काही वेळातच कॉग्रेसच्यावतिने राकेश शेट्टी यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने या ठिकाणी आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचा घटक दल असलेल्या कॉग्रेसकडून राकेश शेट्टी तर राष्ट्रवादीकड़ून संगीता वाजे यांनी मुलुंड मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील, युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील तसेच माजी नगरसेवक धनंजय पिसाळ उपस्थित होते. भाजपाकडून विद्यमान आमदार मिहिर कोटेचा यांनी यापुर्वीच उमेदवारी अर्ज भरलेला आहे. कॉग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरल्याने ही लढत आता तिरंगी होणार आहे.
