Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRA

शिवसेनेचे उमेदवार संजय भालेराव यांचा उमेदवारी अर्ज दाखल,भाजपाचे राम कदम यांच्याशी थेट लढत,

 

मुंबई – शिवसेना (उबाठा) गटाचे घाटकोपर पश्चिमचे उमेदवार संजय भालेराव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. संजय भालेराव यांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार राम कदम तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश चुक्कल हे निवडणुक रिंगणात आहेत.

शिवसेना (उबाठा) गटाचे घाटकोपर पश्चिमचे उमेदवार संजय भालेराव यांनी शक्ती प्रदर्शन करीत आज आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील तसेच विभागप्रमुख सुरेश पाटील व युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. विद्यमान आमदार राम कदम यांच्या बरोबर संजय भालेराव यांची थेट लढत होणार असल्याने राम कदम यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची होणार आहे. संजय भालेराव यांचे या विभागात अधिक प्राबल्य असल्याने राम कदम यांना ही निवडणुक जिंकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. घोटाळा, भ्रष्ट्राचार यांचा ससेमिरा मागे लागल्याने राम कदम यांना ही निवडणुक सोपी जाणार नाही. या भागातून मनसेचे उमेदवार गणेश चुक्कल यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी विद्यमान आमदार राम कदम व संजय भालेराव यांच्यात थेट लढत होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading