Monday, August 10, 2026
Latest NewsSports

आंतरविभागीय महाविद्यालयीन नेमबाजी स्पर्धेत मोहसीन शेखला विजेतेपद

 

पुणे – एकेके न्यू लॉ अकादमीच्या मोहसीन शेखने आंतर विभागीय महाविद्यालयीन नेमबाजीच्या १० मीटर एयर पिस्तूल प्रकारामध्ये विजेतेपद पटकावले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव शुटींग रेंजमध्ये झालेल्या अंतिम फेरीत एकेके न्यू लॉ अकादमी पहिल्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये शिकणाऱ्या मोहसीनने ३८१ गुणांची कमाई करताना विजेतेपद मिळविले. शेवटच्या फेरीत त्याने पहिल्या शॉटमध्ये ९७, दुसऱ्या शॉटमध्ये ९५, तिसऱ्या शॉटमध्ये ९४ तर चौथ्या शॉटमध्ये ९५ गुण मिळविताना अव्वल स्थान राखले. हरीश सोनारने ३७७ गुणांसह दुसरे, उज्ज्वल पाटीलने ३७४ गुणांसह तिसरे तर आर्यन नळेने ३७१ गुणांसह चौथे स्थान राखले.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत देखील मोहसीन शेखने ३७७ गुणांची कमाई करताना विजेतेपद मिळविले होते.

एकेके न्यू लॉ अकादमीचा विद्यार्थी मोहसीनने मिळविलेल्या यशासाठी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, एकेके न्यू लॉ अकादमीचे प्राचार्य डॉ. अतुल झरकर, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख, सहाय्यक प्राध्यापक डॉ. सलीम शेख, डॉ. सुमेर शेख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading