Sunday, June 7, 2026
Latest NewsNATIONAL

मोसादच्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्याचा इस्रायलने घेतला बदला

बैरुत: वृत्तसंस्था 

इस्राएलने केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचे लष्करी मुख्यालय उध्वस्त केले आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह ठार झाल्याचा दावा इस्राएल लष्कराने केला आहे. मात्र, त्याची पुष्टी होऊ शकली नाही. काही दिवसापूर्वी हिजबुल्लाने इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा असलेल्या मोसादच्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्याचा इस्रायलने बदला घेतला आहे. 

लेबानानच्या राजधानीतील दहेह या भागात इस्राएलकडून मोठा हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हिजबुल्लाचे मुख्यालय नष्ट झाले. खुद्द हिजबुल्लाच्या अल् मनार या दूरचित्रवाणी वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला एवढा जोरदार होता की त्यामुळे तीस किलोमीटर परिसरातील इमारतींना हादरे बसले आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. 

दोन दिवसापूर्वी हिजबुल्लाने मोसादच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र डागून हल्ला केला होता. मात्र, इस्राएलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने ही क्षेपणास्त्र वेळीच निकामी केली. या हल्ल्याचा बदला म्हणून इस्रायलने हिजबुल्लाचे लष्करी मुख्यालय जमीनदोस्त केले आहे. या हल्ल्यात हसन नसरल्लाह मरण पावल्याची पुष्टी होत नसली तरीही हिजबुल्लाचे उरलेसुरले कमांडर मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading