Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

दूषित पाण्यामुळे तब्बल 200 जणांना विषबाधा

नांदेड : येथील नेरले गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतील पाणी दूषित झाल्यामुळे गावातील तब्बल 200 जणांना विषबाधा झाली आहे. त्यात प्रामुख्याने लहान मुलांचा समावेश आहे. रुग्णांना नांदेड येथील खाजगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा टाकीतून विषबाधा झाल्यामुळे सुरक्षित आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा हा प्रश्न पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. 

दूषित पाणी प्यायल्यामुळे गावातील अनेक जणांना शुक्रवारी मध्यरात्रीपासून विषबाधा झाल्याने उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही जणांना डोकेदुखी आणि चक्कर येणे अशी लक्षणेही दिसून आली. या सर्व रुग्णांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. नांदेड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक नेरले गावात ठाण मांडून बसले आहे. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading