Sunday, June 7, 2026
BusinessLatest NewsPUNE

गोखले कंस्ट्रक्शन्सतर्फे नवरात्र महोत्सवाची विशेष अशी ‘५० – ५०’ योजना सादर

यंदाचा प्रॉपर्टी फेस्टिव्हल साजरा होणार कोथरूड येथील ‘गोखले बिझनेस बे’ या संकुलात

पुणे  : उच्च दर्जाचे निवासी व व्यावसायिक प्रकल्प साकारण्यासाठी नावलौकिक असलेल्या गोखले कंस्ट्रक्शन्स (Gokhale Constructions)  ने यंदाच्या नवरात्रातील आपल्या भव्य प्रॉपर्टी फेस्टिव्हलची  घोषणा केली आहे. सदर महोत्सवाचे हे सलग १२ वे वर्ष असून शहरातील मोक्याच्या ठिकाणी साकारणाऱ्या विविध प्रकल्पांचे पर्याय व आर्थिक दृष्ट्या अत्यंत लाभदायक अशा योजना यामुळे आपल्या स्वप्नातील घर किंवा ऑफिस घेवू इच्छिणारे ग्राहक या मेगा प्रॉपर्टी फेस्टिव्हलची आतुरतेने वाट पाहत असतात.

याविषयी माहिती देताना गोखले कंस्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले म्हणाले, “गेली ११ वर्षे ग्राहकांनी आमच्या नवरात्र प्रॉपर्टी फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावर्षी ३ ते ११ ऑक्टोबर या नवरात्रीच्या ९ शुभ दिवसांमध्ये घरखरेदीदारांना प्रभात रस्ता, सहकार नगर, करिष्मा चौक – कोथरूड, मॉडेल कॉलनी व कर्वे नगर येथे नजीकच्या भविष्यात साकारणाऱ्या भव्य व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असणाऱ्या गृहप्रकल्पांच्या माध्यमातून ३ व ४ बीएचकेच्या प्रशस्त सदनिका तसेच या प्रकल्पांमधील पेंटहाउस आदी पर्याय उपलब्ध असतील. साधारणतः १६०० ते ८००० चौरस फुट या दरम्यान सदनिकांचे आकारमान असेल ज्याची किंमत रुपये अडीच कोटी ते पंधरा कोटी अशी असेल.”

“कोथरूडच्या अत्यंत मध्यवर्ती भागात निर्माण सुरु असलेल्या ‘गोखले बिझनेस बे‘ या आलिशान व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या फेजमध्ये ऑफिस घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी विशेष अशी ‘फिफ्टी – फिफ्टी’ योजना यंदाच्या प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे एक प्रमुख वैशिष्ट्य असेल. यामध्ये कोथरूड परिसरातील अशा प्रकारच्या पहिल्याच आधुनिक व्यापारी संकुलात ५०% रक्कम भरून ऑफिस घेतल्यास उर्वरित ५०% रक्कम ही पुढील नवरात्र महोत्सवात ताबा घेते वेळी भरता येईल. पहिल्या फेजचे बांधकाम पूर्ण झाले असून तेथील कार्यालयांचा ताबा देण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल. तसेच पुढील महिन्यात या संकुलात ‘वेस्टसाइड’ हे सुप्रसिद्ध दालन ग्राहकांसाठी सज्ज असेल”, अशी माहिती गोखले यांनी दिली.

नवरात्र प्रॉपर्टी फेस्टिव्हलमध्ये घर किंवा ऑफिस घेताना गोखले कंस्ट्रक्शन्सतर्फे अनेक आकर्षक सवलती देखील दिल्या जातात त्या यंदा देखील कायम असतील. तसेच यंदाचा प्रॉपर्टी फेस्टिव्हल हा कोथरूड येथील ‘गोखले बिझनेस बे’ या संकुलात साजरा होणार असल्याचे गोखले यांनी आवर्जून नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading