Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

लाडक्या बहिणीसोबत होतोय ‘गुलिगत धोका’

  • तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात

पुणे : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, साक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली. या योजनेचा तिसरा हप्ता बँकांमध्ये जमा व्हायला सुरूवात झाली आहे. मात्र, या योजने अंतर्गत लाडक्या बहीणीं आधी बँकेंच भलं केल जात असल्याच पुन्हा एकदा उघड झालं आहे. यापूर्वी कर्ज थकलेल्या महिलांच्या बँक खात्यांवर योजनेचे पैसे परस्पर जमा झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तर आता चक्क चार वर्ष वापरात नसलेल्या (inactive bank account) आणि फॉर्म मध्ये न जोडलेल्या  खात्यात महायुतीच्या सरकारने योजनेचे पैसे जमा करत लाडक्या बहिणीसोबत ‘गुलिगत धोका’ केला आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने सूरू केली आहे. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ थेट बँक अकाऊंटमध्ये जमा केले जात आहेत. या योजनेचा पहिला व दूसरा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी जमा झाला होता. त्या वेळी ज्या महिलांच्या खात्यात मिनीमम बॅलन्स नव्हता किंवा ज्या महिलांच्या खात्यावर थकीत कर्ज होते अशा, महिलांच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा झाले. अशा खात्यावर पैसे जमा झाल्यावर बँकांनी लगेच त्यातील रक्कम ही दंड स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात वळते करून घेतले. त्यामुळे अशा महिलांच्या हातात पैसे आलेच नाहीत.

तर आता “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा तिसरा  हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरूवात झाली आहे. यावेळी तर चक्क चार वर्ष वापरात नसलेल्या (inactive bank account)  जे फॉर्म सोबत जोडण्यात आले नव्हते अश्या  खात्यात  सरकारने योजनेचे पैसे जमा करत लाडक्या बहिणीसोबत पुन्हा धोका केला आहे. या खात्यांमध्ये पैसे जमा झाल्या झाल्या बँकेने त्या खातेदारांकडून दंड वसूल केला. इतकेच नव्हे तर या खात्यातून आता पैसे कसे काढायचे? आणि जे खाते जोडले तिथे न जमा होता भलत्याच खात्यात पैसे जमा झाले कसे हा प्रश्न आता लाडक्या बहिणींना पडला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading