Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

अलाइव्ह रीजनरेटिव्ह वेलनेस कडून गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील गार्डसील-९ या लसींबाबत जागरूकता निर्माणासाठी उपक्र

पुणेअलाइव्ह रीजनरेटिव्ह वेलनेस या आरोग्यसेवा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील गार्डसील-९ या लसीबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एक सामाजिक उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी अलाइव्हच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, याचा उद्देश नऊ ते ४५ वर्षे वयोगटातील महिला आणि मुलींना वेळेवर लसीकरण करून घेऊन आरोग्याचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. या उपक्रमाअंतर्गत कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ही लस उपलब्ध करून दिली जात असूनअलाइव्ह क्लिनिकमध्ये सोमवार ते शनिवार, सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा या वेळेत ही लस घेता येईल.

गर्भाशय मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये सर्वांत सामान्य कर्करोगांपैकी एक असूनपाचपैकी एका महिलेच्या मृत्यूचे कारण हा कर्करोग असतो. दरवर्षी सुमारे ७४ हजार महिला या आजाराने मृत्यूमुखी पडतात. गार्डसिल-९ ही लस, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग असून, ही लस गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी सर्वाधिक जबाबदार असणाऱ्या पॅपिलोमा व्हायरस विरुद्ध (एचपीव्ही) संरक्षण प्रदान करतेअलाइव्हचा हा उपक्रम केवळ लसीबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी नाहीतर ती किफायतशीर किमतीत उपलब्ध होण्यातील अडथळे दूर करण्यासाठीचा देखील प्रयत्न आहे. ही लस सहज आणि किफायतशीर किमतीत उपलब्ध केल्यामुळे अधिकाधिक महिला या जीवनरक्षक उपायाचा लाभ घेऊ शकतील.

लसीबाबत माहिती:

नऊ ते ४५ वर्षे वयोगटातील महिलांसाठी गार्डसिल-९ या लसीची शिफारस केली जाते. याचे दोन ते तीन डोस ठराविक कालावधीनंतर घेणे आवश्यक असतेतीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनालसीकरण करण्यापूर्वी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातोमहिलांपेक्षा पुरुषांमध्ये एचपीव्हीमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण कमी असलेतरीही पुरुषांनादेखील ही लस घेता येऊ शकतेही लस या विषाणूच्या नऊ (स्ट्रेनपासूनप्रकारांपासून संरक्षण करते. गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी ७० टक्के कारणीभूत ठरणाऱ्या एचपीव्हीचे १६ आणि १८ हे प्रकार (स्ट्रेन) आणि जननेंद्रियावरील चामखिळीसाठी ९० टक्के कारणीभूत ठरणारे ६ व ११ या (स्ट्रेननाप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी ही लस प्रभावी ठरतेएचपीव्हीमुळे होणारे योनिमार्गवल्व्हरगुदद्वार आणि ऑरोफॅरिंजियल कर्करोगांना प्रतिबंधित करण्यासही ही लस मदत करते.

अलाइव्ह रीजनरेटिव्ह वेलनेसचे संस्थापक ऋषी तांदुळवाडकर म्हणाले“ प्रतिबंध उत्तम आरोग्याचा आधारस्तंभ आहे, असा आमचा विश्वास आहे. समाजाप्रति आमची जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही एचपी लसीबाबत जागरुकता वाढवण्याच्या उपक्रमाद्वारे प्रयत्न करत आहोतकोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ही लस उपलब्ध करून, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची सुरुवात होण्याआधी प्रतिबंध करण्यासाठी सक्षम करणे आणि लोकांना उत्तम आरोग्य मिळविण्यासाठी मदत करणे हा आमचा उद्देश आहे.”

अतिशय प्रभावी असूनहीफक्त दोन प्रकारांपासून ( स्ट्रेनपासूनसंरक्षण करणाऱ्या सर्व्हरिक्स सारख्या इतर लसींच्या तुलनेत गार्डसिल-९ ही लस नऊ (स्ट्रेनप्रकारांपासून संरक्षण देतेज्यात ३१, ३२,३३, ४५ ५२ आणि ५८ या प्रकारांचा समावेश आहे. यामुळे ही लस सर्वांत व्यापक एचपीव्ही लस आहे. यामुळे एचपीव्ही संबंधित

कर्करोगाचा धोका ९० टक्क्यांपर्यंत कमी होतोसर्व्हरिक्स ही लस फक्त महिलांसाठी आहे, तर गार्डसिल-९ पुरुष आणि महिला दोघांसाठीही वापरता येतेव्यापकतासुरक्षा आणि परिणामकारकता यामुळे गार्डसिल-९ एचपीव्ही संबंधित कर्करोग आणि अन्य रोगांपासून सर्वोत्तम संरक्षण देते.

एचपीव्ही हा जगभरातील सर्वांत सामान्य संसर्गांपैकी एक आहे आणि जवळजवळ सर्व लैंगिकदृष्ट्या सक्रिय व्यक्तींना त्यांच्या जीवनात कधीतरी याचा संसर्ग होण्याचा धोका असतो. गार्डसिल-९ ही लस एचपीव्ही संबंधित रोगांपासून दीर्घकाळ संरक्षण प्रदान करतेत्यामुळे ती महिला आणि पुरुष दोघांसाठीही एक आवश्यक प्रतिबंधक साधन आहे. ही लस अधिक सहज उपलब्ध करून देशातील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची प्रकरणे कमी करण्यासाठी मदत करणे हे अलाइव्हचे प्रथम उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading