Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

हेलिओसने भारतात सादर केले इटालियन लक्झरी वॉचमेकर U-BOAT;  उत्सवाच्या काळात ४५% वाढीचे लक्ष्य

दिल्ली : टायटन कंपनी लिमिटेडच्या भारतातील सर्वात मोठ्या प्रीमियम वॉच रिटेलर हेलिओसने भागीदारीच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत सुप्रसिद्ध इटालियन प्रीमियम वॉचमेकर U-BOAT सादर करत आपल्या आंतरराष्ट्रीय पोर्टफोलिओचा विस्तार करत असल्याचे जाहीर केले. सणासुदीच्या काळात हेलिओसच्या पोर्टफोलिओमध्ये या नवीन समावेशामुळे ४५% महसूल वाढीची अपेक्षा आहे. खास, आकर्षक डिझाइन आणि टस्कन कारागिरीसाठी प्रसिद्ध असलेले U-BOAT भारतीय घड्याळ प्रेमींना त्यांच्या अनोख्या शैलीने मोहवून टाकेल. हेलिओसच्या ४० हून अधिक प्रतिष्ठित जागतिक ब्रँड्सच्या रांगेत सामील होत, U-BOAT भारतीय प्रीमियम टाइमपीसच्या जगात आपली अप्रतिम डिझाइन आणि नाविन्यपूर्णता सादर करण्यासाठी सज्ज आहे.

या सादरीकरणाने सणासुदीच्या काळाशी सुसंगतता साधली आहे. त्यामुळे ग्राहकांना विशेष आनंद मिळेल. डिलॉइटच्या अहवालानुसार, सुमारे ४०% ग्राहक विशेषतः सणासुदीच्या काळात भेट देण्यासाठी घड्याळांची निवड करतात. प्रीमियम टाइमपीसची वाढती मागणी ही केवळ त्यांच्या नजाकतदारपणा आणि सौंदर्याच्या प्रतीकांमुळे नाही, तर त्यांच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक महत्त्वामुळेही आहे. विशेषतः जिथे ब्रँड इमेजला मोठे महत्त्व आहे अशा भारतासारख्या बाजारपेठेमध्ये तर हे अधिक लागू होते. ऑनलाइन शॉपिंगच्या सुलभतेमुळे आणि दीर्घकाळ टिकणारी आणि महत्त्वपूर्ण भेटवस्तू म्हणून घड्याळांकडे बघितले जात असल्यामुळे हा प्रवाह आणखी वाढत आहे.

उत्सवी वातावरणामध्ये, U-BOAT घड्याळे त्याच्या ठळक डिझाइन आणि स्विस मूव्हमेंट्ससाठी ओळखली जातात. त्यामुळे ती कणखर व्यक्तिमत्त्वे आणि नेतृत्वगुण असलेल्या व्यक्तींसाठी योग्य टाइमपीस बनतात. नाविन्यपूर्णता आणि कारागिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या U-BOAT ने कार्बन फायबर, टायटॅनियम T5, स्टर्लिंग सिल्व्हर आणि ब्राँझसारख्या प्रगत साहित्याचा वापर केला आहे. या ब्रँडला क्रिस्टल सफायर लाल काचेच्या मॅट इफेक्टसह आणि पेटंटेड सिस्टिम्ससह सुरक्षित हुक लॉकिंग क्राउन आणि क्राउन रिलीज बटणासारख्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसाठीही ओळखले जाते. या ब्रँडचे सर्वात लोकप्रिय डार्कमून कलेक्शन संपूर्ण सिलिकॉन-आधारित ऑईल बाथ असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घड्याळात डोम आकारातील विशिष्ट सफायर क्रिस्टलसह डायल मोठी दिसते आणि कोणत्याही कोनातून परिपूर्ण दृश्यमानता सुनिश्चित करते.

U-BOAT चे 41 SKU’s भारतीय बाजारपेठेत सादर केल्यानंतर हेलिओसने भारतातील आंतरराष्ट्रीय प्रीमियम वॉच ब्रँड्स मिळण्याचे प्रमुख स्थळ म्हणून आपले स्थान अधिक दृढ केले आहे. २४० स्टोअर्सच्या विस्तृत नेटवर्कसह, हेलिओसने चोखंदळ भारतीय ग्राहकांना जगातील सर्वात प्रतिष्ठित टाइमपीसची अतुलनीय निवड करता येण्यासाठी आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आणि येथे यशस्वी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना एक धोरणात्मक प्रवेश मिळवून दिला आहे.

ब्रँड सादर करण्याबद्दल बोलताना टायटन कंपनी लिमिटेडच्या वॉचेस आणि वेअरेबल्सचे उपाध्यक्ष आणि मुख्य विक्री व विपणन अधिकारी श्री. राहुल शुक्ला म्हणाले, “आम्हाला आमच्या चोखंदळ  भारतीय ग्राहकांना हेलिओसमार्फत U-BOAT सादर करताना आनंद होत आहे. हे लाँच भारतातील प्रीमियम आणि नाविन्यपूर्ण टाइमपीसच्या वाढत्या मागणीशी संपूर्णपणे सुसंगत आहे. हेलिओसच्या विस्तार धोरणाचा एक भाग म्हणून, U-BOAT चे सादरीकरण भारतात वैशिष्ट्यपूर्ण आंतरराष्ट्रीय प्रीमियम ब्रँड्सच्या विविध श्रेणी सादर करण्याच्या प्रयत्नांची सुरुवात दर्शवते. हे सादरीकरण  सणासुदीच्या एकदम योग्य काळात होत असून त्यामुळे ग्राहकांना या सण, उत्सवाचा आनंद एकदम शानदारपणे साजरा करण्याची रोमांचक संधी मिळाली आहे. आम्हाला विश्वास आहे की हे लाँच विशेषतः वर्षाच्या या काळात वेगळे टाइमपीस शोधणाऱ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण ठरेल.”

या लाँचबद्दल बोलताना U-BOAT  चे संस्थापक आणि मालक श्री. इटालो फॉन्टाना म्हणाले, “भारताची समृद्ध परंपरा आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वे U-BOAT  च्या आकांक्षेशी पूर्णपणे जुळतात. हेलिओससोबतच्या भागीदारीतून आम्हाला या विलक्षण बाजारपेठेत आमची घड्याळे सादर करण्यास आनंद होतो आहे. टाटा समूहासोबत असलेला आमचा सामायिक दृष्टीकोन आणि मूल्ये यातून ही भागीदारी निर्माण झाली असून ती आधीच व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या यशस्वी ठरली आहे. U-BOAT  हे आपले अनोखे इटालियन डिझाइन, असाधारण साहित्य आणि उच्च गुणवत्तेसाठी ओळखले जाते. U-BOAT  ला प्रीमियम घड्याळांमध्ये अग्रणी स्थान मिळवून देण्याचे आमचे लक्ष्य आहे.”

U-BOAT तर्फे असलेली ही SKU’s १,२२,५०० रु. पासून मुंबई, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता येथील ११ मुख्य हेलिओस स्टोअर्समध्ये उपलब्ध असतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading