Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

रेमंड लाइफस्टाइल शेयर बाजारात पदार्पणासाठी सज्ज

 २०२७ पर्यंत मेन्सवेयर वेडिंग बाजारपेठेत ७% हिस्सेदारीचे उद्दिष्ट, पुढील तीन वर्षात ९०० आउटलेट्स सुरु करणार 

 मुंबई:  रेमंड लाइफस्टाइल लिमिटेडचे (“आरएलएल“) शेयर्स  सप्टेंबर २०२५ रोजी शेयर बाजारात सूचिबद्ध केले जातीलपुढील तीन वर्षात ९०० नवीन आउटलेट्स सुरु करून ही कंपनी आजवरच्या सर्वात मोठ्या रिटेल विस्ताराच्या दिशेने पुढे जात आहेरेमंड ग्रुपच्या लाइफस्टाइल व्यवसायाने वेगाने वाढत असलेल्या मेन्स वेयर वेडिंग बाजारपेठेत २०२७ सालापर्यंत १५सीएजीआरसह बाजारपेठेत हिस्सेदारी मिळवण्याचे उद्दिष्ट आखले आहे.

 रिटेल आणि लाइफस्टाइल व्यवसाय वेगवेगळे करण्यात आल्यानंतर रेमंडच्या दोन सूचिबद्ध कंपन्या असतीलविशेष व्यवसाय उभारून शेअरधारक मूल्य अनलॉक करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहेगेल्या शंभर वर्षांचा वारसा पुढे चालवत असलेल्या रेमंडला भारतात मेन्सवेयर वेडिंग बाजारपेठेत सर्वात मोठा ब्रँड म्हणून नावाजले जातेज्याचे अनुमानित मूल्य जवळपास ७५,००० कोटी रुपये आहेया वर्षाच्या अखेरपर्यंत आरएलएल जगभरात सर्वात मोठ्या तीन कापड पुरवठादारांमध्ये स्थान मिळवण्यासाठी सज्ज आहेआर्थिक वर्ष २०२४ मध्ये या ब्रँडने लग्नासाठीच्या कपड्यांच्या व्यवसायात २५५० कोटी रुपयांची विक्री केली आहेयामध्ये रेमंडचे लग्नाचे आणि फॉर्मल पोशाख तसेच रेमंडचा भारतीय पारंपरिक परिधान ब्रँड ‘एथनिक्स‘ यांचा समावेश आहे.

वेगाने वाढत असलेल्या लाइफस्टाइल विभागात स्वतःचे स्थान अजून जास्त मजबूत करण्यासाठी रेमंड बांधील असल्याचे अधोरेखित करत रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री गौतम सिंघानिया यांनी सांगितलेलाइफस्टाइलवर केंद्रित व्यवसाय उभारून शेअरधारक मूल्य अनलॉक करणे हा या डीमर्जरचा उद्देश आहेया वर्षाच्या अखेरपर्यंत जगातील तीन सर्वात मोठ्या कापड पुरवठादारांमध्ये स्थान मिळवण्यासाठी रेमंड लाइफस्टाइल धोरणात्मकदृष्ट्या अधिक मजबूत बनण्यासाठी प्रयत्नशील राहीलजागतिक स्तरावर अनेक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध आहेतखासकरून चीन आणि बांग्लादेशातील सध्याची आव्हानात्मक स्थिती आणि युकेईयू  ऑस्ट्रेलियासोबत व्यापार करार यामुळे आमच्यासाठी अनेक संधी खुल्या होतील.”

 आरएलएलच्या व्यापक विस्तार योजनांबद्दल रेमंड लाइफस्टाइलचे सीईओ श्री सुनील कटारिया यांनी सांगितले, “रेमंडला भारतीय वेडिंग मेन्सवेयर बाजारपेठेत एक प्रतिष्ठित ब्रँड म्हणून नावाजले जातेरेमंड लाइफस्टाइलमध्ये तीन वर्षांमध्ये ९०० नवीन आउटलेट्सचा विस्तारतसेच स्लीपवेयरइनरवेयर सारख्या नवीन श्रेणी लॉन्च करून आम्ही आजवरच्या सर्वात मोठ्या रिटेल व्यापाराची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहोतइतर अनेक श्रेणींबाबत देखील विचार केला जात आहेआमच्या सध्याच्या ब्रँड्सपैकी ‘एथनिक्स‘ ने याआधीच बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहेपुढील तीन वर्षांमध्ये अजून ३०० एथनिक्स स्टोर्स सुरु करून जवळपास तीन पट वाढ करण्याची आमची योजना आहेआम्ही असे मानतो कीया क्षेत्रामध्ये आम्ही अतुलनीय वृद्धी करू शकतोवेडिंग सेगमेंटमध्ये आमचे स्थान मजबूत झाल्याचा थेट परिणाम बाजारपेठेतील आघाडीची कंपनी या आमच्या स्थानावर पडत आहे.”

केंद्रित आणि संपूर्णपणे ग्राहकोपयोगी व्यवसाय म्हणून आरएलएलने ब्रँडेड टेक्स्टाईल्सचा पाया भक्कम करण्याचेकपडे व्यवसायाच्या वाढीचा वेग वाढवण्याचे आणि एथनिक वेयरइनर वेयरस्लीप वेयर आणि इंटरनॅशनल रिटेल सारख्या नवीन श्रेणी तयार करण्याचा त्रिमितीय धोरणात्मक दृष्टिकोन स्वीकारला आहेआरएलएलने देशात आपले वितरण नेटवर्क वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहेपुढील तीन वर्षांमध्ये ६५० पेक्षा जास्त एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्स (ईबीओसुरु करण्याची त्यांची योजना आहे.

 रेमंड ग्रुपचे चीफ फायनान्शियल ऑफिसर अमित अगरवाल यांनी आरएलएलच्या विकास योजनांबद्दल सांगितलेआमचे अनुमान आहे कीरेमंड लाइफस्टाइल पुढील तीन वर्षात आपला ईबीआयटीडीए दुपटीने वाढवून २० बिलियन रुपयांवर पोहोचवेललाइफस्टाइल क्षेत्रात विक्रीमध्ये १२ ते १५ टक्क्यांची वाढ होईल अशी आशा आहेवेगाने वाढत असलेल्या मेन्सवेयर वेडिंग बाजारपेठेत २०२७ पर्यंत बाजारपेठ हिस्सेदारी मिळवणे रेमंड लाइफस्टाइलचे उद्दिष्ट आहे.”

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading