“तुझ्यापेक्षा गद्दार या घरात कोणीच नाही”; निक्कीचे वैभववर शब्दांचे वार सुरूच
‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
Bigg Boss Marathi New Season Day 37: ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांचा हा आठवडा कसा असणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये कोणता सदस्य कोणाला नॉमिनेट करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. नॉमिनेशन टास्कदरम्यान निक्की वैभववर शब्दांचे वार करताना दिसणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये वैभव निक्कीला नॉमिनेट करताना दिसत आहे. त्यामुळे निक्की वैभवला म्हणतेय,”तुझ्यापेक्षा या घरात गद्दार कोणीच नाही”. त्यावर वैभव म्हणतो,”तुझ्यासाठी इथे मी गद्दारच आहे. तुझ्यासोबत अशी गद्दीरी दाखवणारे की बघ. तू थेट कचरापेटीत जाऊन बस. तुझा बोलण्याचा काही संबंध नाही”. निक्कीसोबत वाद घातल्यानंतर वैभव तिचाच नॉमिनेट करतो.
आज पॅडी दादा आणि छोटा पुढारी अरबाजबद्दल गप्पा मारताना दिसणार आहेत. अरबाजचा सगळा गेम पलटला आहे. त्यामुळे पॅडीला छोटा पुढारी म्हणतोय,”मी अरबाजला बोललो आहे की बाहेर आम्ही बावळट दिसतोय. आपल्यासमोर एक वागतोय आणि निक्कीसमोर वेगळा वागतोय. तोंडावरचा राग स्पष्टपणे त्याने सांगावा”.
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
