Sunday, June 14, 2026
BusinessLatest News

फोम बॉडीवॉश आता होणार सिंथॉल फोम बॉडीवॉश…गोदरेज ग्राहकचे नावीन्यपूर्ण उत्पादन लवकरच

मुंबई : गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड, ही उदयोन्मुख बाजारपेठेतील अंदाजे INR 900 कोटींची आघाडीची कंपनी, भारतातील बॉडी वॉश श्रेणीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी नवनवीन प्रयोग करते आहे. कंपनीने आपल्या Cinthol ब्रँड अंतर्गत फोम आधारित बॉडीवॉश फॉरमॅट सादर केला आहे. सिंथॉल फोम बॉडीवॉश नावाने ओळखले जाणारे, हे उत्पादन झटपट ऑटोमॅटिक फोमरसह येते जे स्पंजची गरज दूर करते. इतर बॉडी वॉश उत्पादनांप्रमाणे हे धुणे फार कठीण नाही आणि जास्त पाण्याची गरज भासत नाही. याउलट सिंथॉल फोम बॉडीवॉश धुणे सोपे आहे.

मिंटेल संशोधनानुसार, भारतातील 90% ग्राहक प्रामुख्याने आंघोळीसाठी साबण वापरतात, तर केवळ 9% भारतीय बॉडी वॉश, शॉवर जेल किंवा शॉवर क्रीम वापरतात. बॉडीवॉश सर्रास वापरला जात नाही. त्याला अनेक करणे आहेत. यात किंमतीचा मुद्दाही महत्त्वाचा असतो. बॉडीवॉश वापरल्याने अतिरिक्त खर्च होतो, असे मानले जाते तसेच आंघोळीसाठी लागणारा वेळ देखील जास्त असतो. याशिवाय लूफाहमध्ये किटाणू मोठ्या प्रमाणावर लपू शकतात.

GCPL चे नवीन अनोखे उत्पादन, सिंथॉल फोम बॉडीवॉश हे गरजेतून विकसित केले गेले आहे. तसेच यामुळे ग्राहकांच्या यासंदर्भातील अडचणींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याचा एकच उद्देश आहे तो म्हणजे, ग्राहकांना दररोज आरामदायी आणि आलिशान आंघोळ करता यावी. सिंथॉल फोम बॉडीवॉश हा एका झटक्यात फोममध्ये रूपांतरित होतो. त्याचे एका भरपूर फेस येणाऱ्या साबणात रूपांतर होते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ होते.

या लॉन्चबद्दल गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) चे मार्केटिंग (पर्सनल केअर) प्रमुख नीरज सेनगुट्टुवन म्हणाले, “भारतीय बॉडीवॉश मार्केटचा चांगलाच विस्तार होतो आहे. कारण, ग्राहक अधिक संवेदनाक्षम आणि आरामदायी शॉवरचा अनुभव घेऊ इच्छितात. आमचे नवीन उत्पादन सिंथॉल फोम बॉडीवॉश, हे त्या दृष्टीनेच विकसित करण्यात आले आहे. यामुळे आलिशान आंघोळ ही दररोजची सवय होईल. आमचे हे नवीन उत्पादन झटपट फोम वितरीत करतात. यामुळे त्वचा स्वच्छ तर होतेच पण त्वचेची रंध्रे एकदम मोकळी होतात. आणि आपल्या त्वचेच्या आपणच प्रेमात पडतो.

सिंथॉल फोम बॉडी वॉश दोन स्फूर्तिदायक सुगंधांमध्ये उपलब्ध आहे, एक त्याचा मूळ सुगंध आणि एक लिंबाचा सुगंध. याचा वापर एक आलिशान आणि समृद्ध शॉवर अनुभव देते. त्याचा नाविन्यपूर्ण फॉर्म्युला झटपट फोम वितरीत करते, एक समृद्ध साबण तयार करते ज्यामुळे लूफची गरज नाहीशी होते, आणि शरीराची स्वच्छता सहज सोपी होते. तुमची त्वचा मऊशार आणि स्वच्छ वाटावी यासाठी डिझाइन केलेले, हे बॉडी वॉश लिंबाचा ताजेपणा त्वचेला देते. ज्यामुळे आपोआप आपल्याला फ्रेश वाटते. दीर्घकाळ टिकणारा हा सुगंध तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवतो, तुमचा आत्मविश्वास वाढवतो. विशेष म्हणजे हे नवीन उत्पादन सर्व प्रकारच्या त्वचेसाठी आणि वयोगटांसाठी योग्य आहे. आणि स्त्री तसेच पुरुष दोघांसाठीही सोयीचा आहे.

नवीन उत्पादनाच्या लाँचला पाठबळ देण्यासाठी, GCPL ने TVC मोहीम सुरू केली आहे. यात साहसी तसेच मनोरंजकतेचा समावेश आहे. TVC ची संकल्पना लाइटबॉक्स, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या इन-हाऊस क्रिएटिव्ह स्टुडिओने केली आहे. सिंथॉल फोम बॉडीवॉश वापरून धबधब्याखाली आंघोळीचा आनंद घेत असलेल्या मुलीने या TVC ची सुरुवात होते. अचानक, आसपास माकडे दिसतात आणि ते बाटली चोरतात. माकडे फोमसोबत खेळात असताना, ती मुलगी त्यांच्याकडे जाते आणि त्यांच्यासोबत हा फोम शेअर करण्याचा निर्णय घेते. यामुळे सगळेच आनंदी होतात. सिंथॉल इन्स्टंट फोम बॉडी वॉशचे हे स्पिरिट दर्शवणारी मुलगी आणि माकडे एकत्र फोमचा आनंद घेत असतानाच जाहिरातीचा समारोप होतो.

गौरव कुमार, लीड क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजिस्ट – लाइटबॉक्स, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL), म्हणाले की, “टीव्हीसी एक मुलगी आणि माकडे एकत्र फोम बॉडी वॉशचा आनंद घेत असल्याचा एक मजेदार व्हिडिओ दाखवते. अर्थात, हा बॉडीवॉश किती सहजपणे निघून जातो, हे ते हायलाइट करतात. साबणाचे ‘बाटलीतील साबण’ या परिवर्तनावर यात भर देण्यात आला आहे. लूफाहची गरज न पडता ते वापरणे सोयीचे होते. ही मोहीम आमच्या प्रेक्षकांना मजेदार गोष्ट सांगत आकर्षक कथाकथनाशी असलेली आमची वचनबद्धता दर्शवते.”

ग्राहकांच्या दृष्टीकोनातून विचार करायचा झाला तर पारंपारिक साबणापासून बॉडी वॉशमध्ये अपग्रेड करण्याला ग्राहकांचे प्राधान्य आहे; तथापि, चढत्या किमती अनेकदा एक महत्त्वपूर्ण अडथळा ठरतात. 200ml बाटलीसाठी फक्त INR 120 रुपये MRP असल्याने सिंथॉल फोम बॉडीवॉश हा ग्राहकांना निश्चितच परवडतो. यासोबतच त्याचा ओरिजनल आणि लिंबाचा सुगंध हे दोन्ही सुगंध मिळतात. केवळ उत्पादनापेक्षा, सिंथॉल फोम बॉडीवॉश तुमच्या संवेदना जागृत करण्यासाठी डिझाइन केले आहे. ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने तर वाटतेच पण तुमचा आत्मविश्वासही वाढतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading