Sunday, June 7, 2026
BusinessLatest NewsPUNE

सचिन तेंडूलकर चितळे बंधू मिठाईवाले यांचे ब्रँड ॲम्बेसेडर

पुणे : आपल्या अनेकविध मिठाई, नमकीन आणि एकाहून एक सरस स्नॅक्स पदार्थांसाठी भारतभर नावलौकिक असलेले चितळे बंधू मिठाईवाले यावर्षी आपल्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना ‘क्रिकेटचा देव’ अशी ओळख असलेले भारतरत्न सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे ब्रँड ॲम्बेसेडर असतील अशी घोषणा चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार केदार व इंद्रनील चितळे यांनी केली आहे. नजीकच्या भविष्यातील चितळे बंधू यांचा हा प्रवास सचिन तेंडुलकर यांच्या प्रमाणेच परंपरा व ‘स्टार पॉवर’ यांचा संगम असलेला व सचिनच्या चाहत्यांप्रमाणेच ग्राहकांनाही आनंद देणारा असेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

दूरदर्शी विचार असलेले स्व. भाऊसाहेब चितळे आणि त्यांच्या नंतर स्व. राजाभाऊ चितळे यांनी १९५० च्या सुमारास चितळे बंधू मिठाईवाले यांची स्थापना केली. या क्षेत्रात दोघांनी उत्कृष्टतेचे नवीन मापदंड प्रस्थापित केले. यामुळे चितळे बंधू हे नाव असंख्य घरांमधील अविभाज्य भाग बनले. गुणवत्ता, दर्जा आणि परंपरेविषयी असलेल्या बांधिलकीमुळे चितळे बंधू मिठाईवाले यांना देशातीलच नव्हे तर परदेशातील घराघरांत सर्वपरिचित नाव म्हणून ओळखले जाते. एका लहान आकाराच्या मिठाईच्या दुकानापासून सुरु झालेला हा प्रवास आज दर्जेदार व स्वादिष्ट उत्पादनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘ब्रँड’पर्यंत विस्तारला आहे. इतकेच नव्हे तर चितळे बंधू हा ब्रँड आपल्या प्रीमियम व विस्तृत श्रेणी सोबतच सर्वसामान्यांना परवडतील अशा श्रेणीमध्ये मिठाई, नमकीन आणि स्नॅक डिलाइट्सची पॉकेट फ्रेंडली उत्पादने यांसाठी देखील ओळखला जातो हे विशेष.

माधव चितळे, श्रीकृष्ण चितळे आणि संजय चितळे यांच्या नेतृत्वाखाली चितळे बंधू यांच्या दुसऱ्या पिढीने व्यावसायिकतेचा पाया रचला. त्यांनी रिटेल व वितरण व्यवस्थेला आणखी भक्कम करून व्यवसायाला खऱ्या अर्थाने बळ दिले आणि त्याचा विस्तार देखील केला. हे करत असताना सामाजिक बांधिलकी व शाश्वत दृष्टीकोन यांच्या बळावर त्यांनी प्रगती साधली. शिवाय त्यांच्या या सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे चितळे बंधू हे नाव ग्राहकांच्या हृदयापर्यंत पोहोचले.

सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ झाल्याचे औचित्य साधत आम्ही आता क्रिकेटच्या या आयकॉनिक ब्रँडसोबत नमकीन व मधल्या भुकेच्या वेळेत खाता येण्यासारख्या (स्नॅक्स) पदार्थांची नवीन श्रेणी ग्राहकांसाठी सादर करणार आहोत. या नव्या श्रेणीतील पदार्थ ग्राहकांच्या आवडत्या चवींपासून प्रेरित झाले असून ते उत्कृष्टतेच्या कसोटीवर खरे उतरतील. चितळे बंधू मिठाईवाले आणि सचिन तेंडुलकर यांचे एकत्र येणे / जोडले जाणे ही केवळ व्यवासायिक भागीदारी नसून एकसारखी मूल्ये, वारसा आणि उत्कृष्टता या सर्व बाबींचा सुरेख संगम आहे, असे चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार केदार चितळे यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading