Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना धक्का द्यायला रितेश भाऊ सज्ज!

Bigg Boss Marathi New Season Day 28 : ‘बिग बॉस मराठी’चा चौथा आठवडा खूपच धमाकेदार होता. घरातील सदस्यांमध्ये वाद, रडारडी, भांडणं, पाहायला मिळाली. घरातील काही सदस्यांचं खूप कौतुक झालं तर काहींना मात्र नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं. आठवडाभरात सदस्यांनी केलेल्या राड्यावर रितेश भाऊ आता सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात नॉमिनेशनची चूल पेटली आणि हाऊसफूल एन्टरटेनमेंट झालं. कोणी कोणाला धूळ चारली तर कोणाची बत्ती गूल झाली. आता आठवड्याभरातील या सर्व गोष्टींवर चर्चा करुन रितेश भाऊ सदस्यांना जोरदार भाऊचा धक्का द्यायला आता सज्ज आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात सत्याचा पंचनामा झाला, नॉमिनेशची चूल पेटली. अशा अनेक गोष्टींदरम्यान घरातील सदस्यांनी हा आठवडा चांगलाच गाजवला आहे. काहींकडून गंभीर चूका झाल्या असून सदस्यांना रितेश भाऊ आता या चूका दाखवून देणार आहे.

‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading