Wednesday, October 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

उत्तर पेशवाईच्या काळात जसा कारभार होता तसा राज्यात सुरू – संजय राऊत

मुंबई:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल आहेत. उत्तर पेशवाईच्या काळात जसा कारभार सुरू होता तसा कारभार राज्यात सुरू आहे. सर्वत्र लूटमार होत आहे. अनागोंदी माजली आहे. मात्र, घाशीराम कोतवालाचे पुढे काय होते हे आम्ही लवकरच महाराष्ट्रातील जनतेला दाखवून देऊ, असा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

घाणेरड्या राजकारणाचा अंत जवळ 

फडणवीस यांनी महाराष्ट्रात विद्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. मात्र, त्यांच्या या घाणेरड्या राजकारणाचा अंत जवळ आला आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे त्यांनी गाशा गुंडाळायला सुरुवात करावी, असा सल्लाही राऊत यांनी फडणवीस यांना दिला. 

आम्ही सूडाचे राजकारण करीत नाही 

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास महायुती सरकारच्या चांगल्या योजना बंद केल्या जातील, या आरोपाचा देखील राऊत यांनी समाचार घेतला. या योजना बंद, त्या योजना बंद, असे घाणेरडे राजकारण फडणवीस यांनी केले. आम्ही सूडाचे राजकारण करणारे राज्यकर्ते नाही. आणि यापूर्वी चांगल्या पद्धतीने राज्य हाताळले आहे. शिवसेनेने महाराष्ट्राला तीन-तीन मुख्यमंत्री दिले आहेत. चांगल्या योजना कधीही बंद होत नाहीत. नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसच्या काळातील अनेक योजना सुरू ठेवले आहेत. फक्त त्यांची नावे बदलली आहेत, असेही राऊत यनी सांगितले. 

… तो महाराष्ट्र तुम्हाला सत्ता देईल का? 

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दावा केलेले बहुमत ज्या महाराष्ट्राने रोखले तो महाराष्ट्र तुम्हाला पुन्हा सत्ता देईल का, असा सवाल करत संजय राऊत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी बहुमत मिळवून सत्ता स्थापन करेल, असा दावाही केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading