ईव्ही बॅटरी क्षमतावाढीसाठी पुण्यातील प्रा. गणेश लोहार यांचे संशोधन
प्रा. लोहार हे सध्या सिंबायोसिस स्किल्स विद्यापीठ पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नुकतेच त्यांनी पीएचडीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी ईव्ही बॅटरीच्या रिअल-टाइम’मध्ये स्टेट ऑफ चार्ज (एसओसी) आणि स्टेट ऑफ हेल्थ (एसओएच) व सेफ्टीवर उपयुक्त असे संशोधन करून ते वायरलेसरित्या कसे पाठविता येईल व बॅटरीचे आयुष्य कसे वाढेल, यावर महत्त्वपूर्ण काम केले आहे. संदीप विद्यापीठ नाशिक येथील उपस्थित परीक्षकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले व या विषयावर पेटंटसाठी अर्ज करण्याकरिता त्यांना प्रोत्साहित केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेंद्र सिन्हा यांनी प्रा.लोहार यांचा सत्कार केला. प्रा.लोहार यांना डॉ.मोर्धा सुरेशकुमार यांनी मार्गदर्शन केले.
इलेक्ट्रिक वाहने आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रणालींसारख्या शाश्वत ऊर्जा उपायांच्या शोधात ‘एसओसी’ आणि ‘एसओएच’चा अचूक अंदाज लावण्यास सक्षम प्रगत बॅटरी व्यवस्थापन प्रणाली (बीएमएस) विकसित करणे आवश्यक आहे. ‘कोर बॅटरी पॅरामिटर्स’चे मापन आणि नियंत्रण सुधारून ‘बीएमएस’चे महत्त्व गेल्या दशकांमध्ये दाखवले गेले आहे. पारंपरिक बीएमएस सिस्टीमच्या तुलनेत कमी क्लिष्टता, लवचिकता आणि कमी खर्च यासारख्या फायद्यांमुळे वायरलेस बीएमएस हा आता ईव्ही उद्योगात वाढणारा ट्रेंड आहे.
संदीप विद्यापीठ नाशिक येथील परीक्षक डॉ. परेश शहा आणि अध्यक्ष डॉ. विभा कपूर आणि इतर समिती सदस्यांनी त्यांचे कौतुक केले. कठोर सिम्युलेशन द्वारे वायरलेस बीएमएसचा प्रभाव पडतो. बॅटरी पॅकची कामगिरी, सुरक्षितता आणि दीर्घायुष्य सुनिश्चित होते. त्याच्या अभ्यासाचे निष्कर्ष बीएमएस तंत्रज्ञानाने बॅटरीवर चालणाऱ्या प्रणालींमध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा केला आहे. ऊर्जा व्यवस्थापनामध्ये क्रांती घडवून आणण्याबरोबरच बॅटरी तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी प्रा. लोहार यांच्या संशोधनामुळे मदत झाली आहे.
