Saturday, May 9, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘सूर्या” मराठी चित्रपटाची कान्स महोत्सवात निवड

सुप्रसिध्द लेखक दिग्दर्शक शरद गोरे लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत “एक प्रेरणादायी प्रवास सूर्या”या मराठी चित्रपटाने 2024 मध्ये प्रतिष्ठित फ्रान्स देशातील कान्स चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. हा चित्रपट एका शेतकरी कुटूंबातील गरीब विद्यार्थ्याचा संघर्षमय प्रवास सांगणारा हा चित्रपट आहे अनेक संकटांशी झुंज देत IAS होऊन कलेक्टर होण्याचे स्वप्न साकार करतो,जगभरातील 2 हजार चित्रपटातून टॉप 50 चित्रपटांमध्ये निवड या महोत्सवासाठी झाली आहे यातून विजेत्यांची निवड होणार आहे,

‘सूर्या’ची त्याच्या अनोख्या प्रेरणादायी कथानकासाठी प्रशंसा जात आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीरेखेचा जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो असे चित्रपटाचे कथानक प्रेरणा,परिश्रम आणि दृढनिश्चय या विषयांभोवती विणलेले गेले आहे.

 कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाच्या निवडीमुळे या चित्रपटात 
काम करणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक प्रतिभावान कलाकारांना ओळख मिळणार आहे. बार्शी, सोलापूर, अकलूज, कुर्डूवाडी या सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. त्यात सुनील साबळे,अमोल कुंभार, सुजाता काळोखे, राहूल शिंदे यांनी हि आपल्या भूमिका सफाईदारपणे वठवल्या आहेत, प्रगती सूर्यवंशी, महारुद्र जाधव, फुलचंद नागटिळक आदी जण पाहुणे कलाकराच्या भूमिकेत दिसणार आहेत,

‘सूर्या’मागील बहुआयामी प्रतिभा असलेल्या शरद गोरे यांनीही खलनायकाची भूमिका खूप सशक्तपणे साकारली आहे. शरद गोरे, प्रकाश बनसोडे, सूवर्णा पवार यांची गीते असून शरद गोरे यांनी संगीतबध्द केले आहे तर चित्रपटाचे छायांकन रवींद्र लोकरे यांनी केले आहे. शरद मधुकर गोरे व नितीन रतीलाल पाटील हे चित्रपटाचे निर्माते आहेत, प्राची सूर्यवंशी मुख्य अभिनेत्री असून या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका नितीन रतीलाल पाटील यांनी खूप प्रभावीपणे साकारली आहे. चित्रपटाचे यश हे त्याच्या दूरदृष्टीचा आणि कथाकथनाच्या समर्पकपणाचा पुरावा आहे. या अगोदर रणांगण एक संघर्ष, उषःकाल, प्रेमरंग आदी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन शरद गोरे यांनी केले आहे,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading