“बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी यंदा कोकणातच जाणार..”
‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू-वालावलकरने सांगितलं मत
महाराष्ट्रातील तमाम रसिकांचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये शोमध्ये बरेच मोठे बदल झाल्याचे आपल्याला दिसून आले आहेत. मग ते नव्या होस्टचं येणं असो.. किंवा मग नवीन खेळाडू.. सगळेच कसे जबरदस्त पॉवरने भरलेले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री करताना कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर म्हणाली होती,”बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी यंदा कोकणातच जाणार”.
अंकिताचा प्रवास अनोखा आणि रोमांचक ठरत आहे. कोकणच्या साधेपणाने आणि आपुलकीने ओतप्रोत भरलेली अंकिता नक्कीच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक नवीन रंग भरणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाण्याआधी रितेशबद्दल अंकिता म्हणाली,”मी त्यांच्याबद्दल ऐकलं आहे की ते शांत आहेत. त्यामुळे ते कसे चिडतील याची थोडी भिती वाटतेय, तशी मी काही तयारी करून आली नाही आहे. आधीचे सीझन सुद्धा बघितले नाहीत. पण हा प्रवास मला अनुभवायचा आहे आणि या सीजनमध्ये मीच जिंकेन आणि ट्रॉफी कोकणात घेऊन जाईन.”
अंकिता प्रभू-वालावलकर ‘बिग बॉस’च्या घरात कोकणी हिसका दाखवताना दिसत आहे आहे. तिच्या या प्रवासात काय-काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना एपिसोडच पाहावा लागेल .’बिग बॉस’मराठीचा नवा सीझन करा एन्जॉय दररोज रात्री 9 वाजता पाहा. फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर.
