Tuesday, June 16, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

बांगलादेशच्या परिस्थितीवर भारत बारकाईने नजर ठेवून – परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

नवी दिल्ली:  बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्यानंतरच्या परिस्थितीवर भारत बारकाईने नजर ठेवून आहे. बांगलादेशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना बांगलादेशातील परिस्थितीची माहिती दिली. 

भारत आणि बांगलादेश यांच्यात कनिष्ठ संबंध आहेत. वास्तविक भारतीय लष्कराने पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेशची निर्मिती केली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये राजनैतिक, सांस्कृतिक, आर्थिक संबंध धूळ स्वरूपाचे आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये तब्बल 4000 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीची सीमारेषा आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये घडणाऱ्या घडामोडींचे पडसाद भारतात उमटणे स्वाभाविक आहे. 

बांगलादेशातील अराजकसदृश परिस्थितीला विदेशी शक्ती कारणीभूत आहेत का असा सवाल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केला. याला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, याबद्दल सध्या ठोस विधान करणे अयोग्य ठरेल. मात्र, बांगलादेशात विदेशी शक्तींच्या हस्तक्षेपाची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बांगलादेशातील परिस्थितीचा संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून आढावा घेण्यात यावा, अशी मागणी ब्रिटनने केली आहे. मात्र, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आश्रय देण्याबाबत ब्रिटनने कोणतेही विधान केलेले नाही. लष्कर प्रमुखांच्या सल्ल्यानंतर शेख हसीना यांनी लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून भारतात आश्रय घेतला आहे. पुढे त्यांना लंडन येथे जाण्याची इच्छा आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading