Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘बिग बॉस मराठी’च्या घरात बनतोय कॅप्टनसीच्या टास्कचा कमाल गेम प्लॅन

Bigg Boss Marathi New Season Day 10 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ हे पहिलं कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. पहिल्या ‘कॅप्टनसी टास्क’दरम्यान घरातील सदस्य प्लॅनिंग करताना दिसणार आहेत.’कॅप्टनसी’च्या सीटचा प्रश्न असल्याने घरातील सदस्य कमाल गेम प्लॅन बनवताना दिसत आहेत. कॅप्टनसीसाठी अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळीचे एकमेकांसाठी वेगळे प्लॅन आहेत. तर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू-वालावलकरदेखील तिचा प्लॅन ठरवताना दिसत आहे. अरबाज आणि निक्की कॅप्टनसीसाठी निखिलचा सपोर्ट मागताना दिसत आहे. तर निखिलदेखील अरबाजला फुल ऑन सपोर्ट करायला तयार होतो. एकंदरीतच पहिल्याच टास्कदरम्यान घरात धमाका होणार आहे.

‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading