Tuesday, June 16, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

भाजप जनतेला चक्रव्यूहात अडकवून पाहतय – काँग्रेस नेते राहुल गांधी

नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्ष भारताच्या जनतेला, शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांना कमळरूपी चक्रव्यूहात अडकवून पाहत आहे. हे चक्रव्यूह भेदण्यासाठी इंडिया आघाडीने पुढाकार घेतला आहे. इंडिया आघाडी म्हणजे शिवाजी वरात आहे. इथे कोणासही मज्जाव नाही. शिवाच्या वरातीत कोणीही येऊन नाचू शकतो. भाजपचे कमळरूपी चक्रव्यूह आणि शिवाची वरात यांच्यात युद्ध छेडले गेले आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना नमूद केले.

स्वतःला हिंदू म्हणणाऱ्या भाजपला हिंदू धर्म कळलेला नाही. हिंदुस्तान चा स्वभाव पडलेला नाही. हिंसा आणि द्वेष म्हणजे हिंदुत्व नाही. प्रत्येक धर्मात चक्रव्यूह भेदण्याची तरतूद आहे. शीख धर्मात सेवा करण्यापासून कोणालाही रोखण्यात आलेले नाही. मुस्लिम धर्मात मशिदीत जाण्यापासून कोणालाही रोखले जात नाही. त्याचप्रमाणे शिवाच्या वरातीत कोणीही येऊन नाचू गाऊ शकतो. आम्ही चक्रव्यूह भेदण्याचे काम करतो. मनरेगा, हरितक्रांती ही चक्रव्यूह भेदणारी कामे आहेत. त्यामुळे देशात उत्साह आणि आनंद निर्माण होतो, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

जातीनिहाय जनगणनेची मागणी 

देशात जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. दलित, आदिवासी, मागास सर्वसामान्य जनतेला जातीनिहाय जनगणना हवी आहे. सरकार हलवा वाटते आणि तो हलवा केवळ मोजक्या लोकांच्या हातात पडतो. अधिकाधिक गरजूंपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे, त्यामुळे देश बदलेल. असे मत राहुल गांधी यांनी मांडले.

पंतप्रधानांच्या आत्मविश्वासाला तडा दिला

या देशातील मागास जनता अभिमन्यू नाही. देशातील गरीब कष्टकरी जनता, मागास वर्ग, महिला आणि युवक भाजपच्या चक्रविवाहात अडकणार नाहीत. ते चक्रव्यूह भेदणार आहेत. त्यादृष्टीने इंडिया आघाडीने पहिले पाऊल उचलले आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मविश्वासाला तडा दिला आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading