Paris Olympics 2024 : नेमबाज मनू भाकरने जिंकले कांस्य पदक
नवी दिल्ली : भारताची युवा नेमबाज मनू भाकरने रविवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. तिने कांस्य पदकावर आपली माेहर उमटवली आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक पटकविणारी ती देशाची पहिली नेमबाज ठरली आहे. ( Paris Olympics 2024: Shooter Manu Bhakar wins bronze medal)
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारत मनू भाकरने अंतिम फेरीत धडक मारली आहे. पात्रता स्पर्धेत तिने 580-27 गुणांसह तिसरे स्थान पटकावले होते. अंतिम सामन्या सुरुवातीपासून तिने अचूक लक्ष्य साधले. आज तिच्या कामगिरीत अचूकता आणि दृढनिश्चय याचे मिश्रण दिसून आले. पाच शॉट्सच्या पहिल्या राउंडला 50.4 शूट करून दुसरे स्थान पटकावले. मात्र दुसर्या राउंडमध्ये तिने प्रत्येकी 5 शॉट्सच्या दोन मालिकेनंतर एकूण 100.3अंकांसह मनू तिसर्या स्थानवर राहिली. तिसर्या राउंडमध्ये 121.2 गुणांसह मनू भाकर दुसऱ्या स्थानावर राहिली.
२२ वर्षीय मनू भाकर ही मूळची हरियाणातील झज्जर येथील. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मनूला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. ऐन स्पर्धेवेळी तिची पिस्तुल खराब झाली होती. तिचे २० मिनिटे वाया गेली. यामुळे ती अंतिम फेरीपूर्वीच बाहेर पडली होती. या अपयशाने मनू थाेडी खचली हाेती. मात्र तिला तिच्या कुटुंबीयांची भक्कम साथ लाभली. अपयश हीच यशाची पहिली पायरी मानत तिने पॅरिस ऑलिम्पिकसाठी प्रचंड परिश्रम घेतले. आपल्या दृढनिश्चियाच्या जोरावर तिने जोरदार पुनरागमन करत अंतिम फेरीत धडक मारली होती. कोट्यवधी भारतीयांच्या आशा मनू भाकरच्या कामगिरीकडे लागल्या होत्या. मनूही टोकियो ऑलिम्पिकमधील अपयश धूवून काढत … पदकाला गवसणी घातली. नेमबाजीत पदक पटकविणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
