Thursday, September 24, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मुख्यमंत्र्यांकडून लोकप्रतिनिधीचा अवमान आणि विशेष अधिकाराचा भंग : आमदार संजय जगताप

सासवड:  आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमाची पूर्वकल्पना देऊनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातील समस्यांबाबत आपल्या अनुपस्थितीत बैठक आयोजित करणे हा लोकप्रतिनिधीचा अवमान आणि विशेष अधिकाराचा भंग असल्याचा आरोप करून आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार केली आहे. 

काही दिवसांपूर्वी पुरंदर आणि हवेली विधानसभा मतदारसंघातील समस्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहात बैठकीचे आयोजन केले. त्याच दिवशी आपली सासवड येथे आमसभा असल्याचे आणि त्याचे नियोजन एक महिन्यापूर्वी करण्यात आल्याचे आपण मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सचिवांच्या निदर्शनास आणून दिले. ही बैठक पुढे ढकलण्याची विनंती आपण त्यांना केली. मात्र, या मागणीचा विचार न करता मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पाडली, असे जगताप यांनी सांगितले. 

आपल्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना देऊन आणि बैठक पुढे ढकलण्याची विनंती करूनही त्याबाबत विचार न करता आपल्या अनुपस्थितीत ही बैठक घेणे हा लोकप्रतिनिधींचा अवमान आहे. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींना असलेल्या विशेष अधिकारांचा भंग आहे. आपण मुख्यमंत्र्यांचा सन्मान करतो. त्यांनीही लोकप्रतिनिधी म्हणून आपला मान ठेवणे गरजेचे आहे, असे जगताप म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading