Monday, June 8, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्याच्या पूर परिस्थिती बाबत तात्काळ उपाययोजना करा – खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारकडे मागणी!!!

पुणे : पुण्याच्या पूर परिस्थितीबाबत तात्काळ उपायोजना करा – खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या ‘झिरो अवर’ मध्ये केली मागणी!!! पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघात पुण्याचा काही शहरी भाग येतो. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या संपूर्ण भागात प्रचंड अतिवृष्टी झाली. प्रशासनाने काल रात्री धरणातून पाणी सोडले. हे पाणी सोडण्याआधी प्रशासनाने नागरिकांना कळवायला हवं होतं, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ऑरेंज किंवा रेड अलर्ट आहे हे माहित असूनही पुण्याच्या नागरिकांना का सांगण्यात आले नाही? असा प्रश्नदेखील त्यांनी सभागृहात उपस्थित केला. पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांतील नागरिक प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने NDRF च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला पॅकेज आणि सहकार्याची मदत करावी, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading