Thursday, September 24, 2026
ENTERTAINMENTLatest News

स्त्री 2 मधल “आज की रात” मध्ये दिसली तमन्ना भाटिया ! 

 पॅन इंडियाची स्टार तमन्ना भाटिया अनेक हिट चित्रपटांसह अभिनय कौशल्य सिद्ध करत असताना आता तिच्या नृत्य कौशल्याने इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. रजनीकांत स्टारर ‘जेलर’ मधील ‘कावला’ असो किंवा ‘अरनमानाई 4’ मधील ‘अचाचो’ असो अभिनेत्री तिच्या नृत्याने सगळ्यांना मोहित करते.
 तिने आजवर अनेक चित्रपट सुपरहिट केले आणि म्हणून ती सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक ठरली. तमन्ना आता ‘स्त्री 2’ मध्ये तिच्या नृत्य कौशल्या ने प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी सज्ज झाली आहे. निर्मात्यांनी स्त्री 2 चित्रपटातील पहिल्या गाण्याचे अनावरण केले ज्याचे शीर्षक आहे ‘आज की रात’ ज्यामध्ये तमन्ना तिच्या नृत्याने चित्रपटातील हॉटनेस वाढवताना दिसतेय.
सचिन-जिगर या डायनॅमिक जोडीने ते संगीतबद्ध केले आहे. विजय गांगुलीच्या अविश्वसनीय नृत्यदिग्दर्शनासह हे गाणं चर्चेत येतंय. सोशल मीडिया वर गाणं रिलीज होताच प्रेक्षकांनी तमन्ना च कौतुक केलं आहे. १५ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या ‘स्त्री २’ मधल्या या गाण्याने गंमत वाढवली आहे. राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, श्रद्धा कपूर आणि इतर कलाकार असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे.
दरम्यान, तमन्नाचे चाहते अभिनेत्रीला ‘ओडेला 2’, ‘वेदा’ आणि ओटीटी प्रोजेक्ट ‘डेअरिंग पार्टनर्स’सह अनेक आगामी रिलीजमध्ये पाहण्याची वाट बघतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading