Sunday, June 7, 2026
Latest NewsSports

दुसऱ्या फिशर रँडम(बुद्धिबळ960) रॅपिड बुद्धीबळ स्पर्धेत चार खेळाडू संयुक्तरीत्या आघाडीवर 

पुणे : बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल (पीडीसीसी)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या फिशर रँडम(बुद्धिबळ960) रॅपिड बुद्धीबळ स्पर्धेत पाचव्या फेरीअखेर अविरत चौहान, वरद वलदे, विरेश शरणार्थी, श्लोक शरणार्थी यांनी 4.5गुणांसह संयुक्तरीत्या आघाडी प्राप्त केली.
प्रभात रोड येथील सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत पाचव्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत अविरत चौहानने वरद वलदेला बरोबरीत रोखले व 4.5 गुणांची कमाई केली.
दुसऱ्या पटावर विरेश शरणार्थीने ईशान वारुडकरचा पराभव करून 4.5गुण मिळवले. श्लोक शरणार्थी याने अक्षज पाटीलवर मात करत 4.5गुण प्राप्त केले.
याआधी गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातील बुद्धिबळ प्रशिक्षक श्री.केतन खैरे व श्री. अभिजित जोशी यांना बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट द्वारा सन्मानित करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रकाश कुंटे, चीफ आरबीटर आयए नितीन शेणवी, डेप्युटी चीफ आरबीटर आयए विनिता क्षोत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: पाचवी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार:
अविरत चौहान (4.5गुण)बरोबरी वि. वरद वलदे(4.5गुण);
ईशान वारुडकर (4गुण)पराभुत वि. विरेश शरणार्थी(4.5गुण);
श्लोक शरणार्थी(4.5गुण) वि.वि.अक्षज पाटील(3.5गुण);
मिहिर सरवदे(4गुण) वि.वि.प्रथमेश शेरला(3गुण);
विकास शर्मा(3.5गुण)बरोबरी वि. आदित्य जोशी(3.5गुण);
ओम लामकाने(4गुण) वि.वि.सुयोग वडके(3गुण);
केवल निर्गुण(3गुण)पराभुत वि. निहिरा कौल(4गुण);
आदित्य गद्रे(3.5गुण)बरोबरी वि. सौरभ म्हामने(3.5गुण);
प्रनव बुरली(4गुण) वि.वि.शाश्वत गुप्ता(2.5गुण);
सिद्धांत साळुंखे (2.5गुण)पराभुत वि. अद्वैत फडके(3.5गुण);
अद्वैत कुमार(2.5गुण)पराभुत वि. परम जालन(3.5गुण);
आरुष बुदजादे (3.5गुण) वि.वि.श्रावणी उंडाळे (2गुण);
श्लोक माळी(2.5गुण)बरोबरी वि. वेदांत काळे(2.5गुण);
सोनी इक्षा(3गुण) वि.वि.अथर्व गावडे(2गुण);
अमित युग(3गुण)वि.वि.शिवम पेठकर(2गुण).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading