Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

आय फायनान्‍सची आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्‍ये दमदार कामगिरी

मुंबई : आय फायनान्‍स भारतभरातील वंचित सूक्ष्‍म उद्योगांना खेळते भांडवल व निश्चित भांडवल प्रदान करणाऱ्या विभाग अग्रणी कंपनीने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्‍त झालेल्‍या आर्थिक वर्षासाठी (आर्थिक वर्ष २०२३-२४) उल्‍लेखनीय आर्थिक कामगिरीची घोषणा केली आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्‍ये आय फायनान्‍सने प्रमुख आर्थिक मेट्रिक्‍समध्‍ये उल्‍लेखनीय वाढीची नोंद केली. कंपनीचा करोत्तर नफा गेल्‍या वर्षातील ५७ कोटी रूपयांवरून जवळपास तीनपटीने वाढून १६१ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला, ज्‍यामधून कंपनीचे प्रबळ व्‍यवसाय मॉडेल आणि कार्यरत कार्यक्षमता दिसून येते. महसूल आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील ६४३.३४ कोटी रूपयांच्‍या तुलनेत ६७ टक्‍क्‍यांनी वाढून १०७२ कोटी रूपयांवर पोहोचले. महसूलामधील या मोठ्या वाढीमधून कंपनीची विस्‍तारित असलेली बाजारपेठ उपस्थिती आणि सूक्ष्‍म उद्योजकांमध्‍ये कंपनीच्‍या आर्थिक उत्‍पादनांसाठी वाढती मागणी दिसून येते.

आय फायनान्‍सच्‍या असेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम)मध्‍ये देखील उल्‍लेखनीय वाढ झाली, जे आर्थिक वर्ष २३ मधील २७०० कोटी रूपयांवरून ४४०० कोटी रूपयांवर पोहोचले. एयूएममधील या वाढीमधून कंपनीची लेण्डिंग कार्यसंचालनांमध्‍ये वाढ करण्‍याची, तसेच मालमत्ता दर्जा कायम ठेवण्‍याची क्षमता दिसून येते. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे, कर्जदात्‍यांनी कंपनीचे नेट एनपीए १ टक्‍क्‍यांपेक्षा कमी ठेवले, ज्‍यामधून कंपनीच्‍या प्रबळ जोखीम व्‍यवस्‍थापन पद्धती निदर्शनास येतात. आयचा बहुतांश पोर्टफोलिओ मालमत्ता व गहाणच्‍या हायपोथेकेशनद्वारे सुरक्षित आहे, ज्‍यामुळे कंपनीची आर्थिक स्थिरता अधिक दृढ होईल.

आय फायनान्‍सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक संजय शर्मा म्‍हणाले, ”आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील आमच्‍या अपवादात्‍मक कामगिरीमधून आमच्‍या व्‍यवसाय मॉडेलची स्थिरता, आमच्‍या टीमने केलेली अथक मेहनत आणि बहुमूल्‍य ग्राहकांचा आमच्‍यावर असलेला विश्‍वास दिसून येतो. मायक्रो एमएसई विभागाच्‍या स्थिर बाजारपेठेवर आमची वाढ झाली आहे. आम्‍ही एमएसईंना सक्षम करण्‍यासाठी, आर्थिक समावेशनाला गती देण्‍यासाठी आणि देशाच्‍या एकूण आर्थिक विकासाप्रती योगदान देण्‍यासाठी कटिबद्ध आहोत. अधिक पुढे जात, आम्‍ही व्‍यापक विकास संधींचा फायदा घेण्‍यासाठी आणि या महत्त्वपूर्ण विभागाकरिता नाविन्‍यपूर्ण आर्थिक सोल्‍यूशन्‍सची आघाडीची प्रदाता म्‍हणून आमचे स्‍थान अधिक दृढ करण्‍यासाठी उत्तमरित्‍या सुसज्‍ज आहोत.”

२०१४ मध्‍ये स्‍थापना झाल्‍यापासून आय फायनान्‍सने सूक्ष्‍म उद्योजक विभागाच्‍या आर्थिक समस्‍यांचे निराकरण करण्‍यामध्‍ये लक्षणीय प्रयत्‍न केले आहेत. कंपनीने ९ लाखांहून अधिक व्‍यवसायांना १०,००० कोटी रूपयांहून अधिक वितरण केले आहे, ज्‍यामधून भारतातील एमएसएमई लँडस्‍केपवरील त्‍यांचा मोठा प्रभाव दिसून येतो. आयच्या यशाचे श्रेय जोखीम व्‍यवस्‍थापनासाठी त्‍याचे अद्वितीय क्‍लस्‍टर-आधारित क्रेडिट कार्यपद्धती, सूक्ष्‍म उद्योजकांच्‍या विशिष्‍ट गरजांची पूर्तत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली उत्‍पादन श्रेणी आणि प्रबळ जोखीम व्‍यवस्‍थापन व शासन धोरणे यांना जाऊ शकते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading