Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल तर्फे ‘स्प्लॅश ऑफ कलर्स’ चित्रकला स्पर्धेचे आयोजन

पिंपरी – आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल तर्फे ‘स्प्लॅश ऑफ कलर्स’ या आनंददायी आणि लहान मुलांसाठी विशेष अशा मान्सून चित्रकला स्पर्धेचे आयोजन केल्याची घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा रविवार २१ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ वाजता, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला अंदाजे ६०० लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. चित्रकला स्पर्धे बरोबरच पालकांना मोफत आरोग्य तपासणी सेवेचा ही लाभ घेता येणार आहे. हॉस्पिटल तर्फे नवीन व्हॅक्सिनेशन क्लिनिकचे सुध्दा उद्घाटन करण्यात येणार असून हे व्हॅक्सिनेशन क्लिनिक या उपक्रमानंतरही संपूर्ण वर्षभर सर्वसाधारण लसीकरणासाठी खुले असणार आहे.
या दिवशी स्पर्धे व्यतिरिक्त सर्व वयोगटासाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आकर्षक जादूचे प्रयोग, पथनाट्याचे प्रयोग, आकर्षक मॅस्कॉट्स, संगीत आणि नृत्याच्या आयोजनासह आनंददायी खेळ आणि खाद्यपदार्थांची रेलचेल संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान असणार आहे.‍
चित्रकला स्पर्धा ही तीन विविध वयोगटात असेल पहिला वयोगट हा ३ ते ४ वर्षे, दुसरा ग्रुप हा ५ ते ९ वर्षे आणि तिसरा गट हा १० ते १५ वर्षे असा असेल. वयोमानानुसार उपक्रमांसह विविध स्पर्धांचे आयोजन हे वयोगटाच्या आवडी आणि क्षमतांनुसार करण्यात आले आहे, जेणेकरुन सर्व स्पर्धकांना आनंददायी अनुभव मिळू शकेल.
ज्या लोकांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ते + ९१ ९८८११२३०३१ वर कॉल करु शकतात. स्पर्धेची नोंदणी १९ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० पूर्वी करणे आवश्यक आहे. सहभागी लोकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी असून पहिल्या १० चित्रांना हॉस्पिटल मध्ये प्रदर्शित केले जाणार आहे.
तर मग आयोजकांना सहकार्य करुन दिवस अधिक कलात्मक, आनंदी आणि आरोग्यपूर्ण करुया !

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading