Sunday, June 7, 2026
Latest NewsSports

कार्ल हुपर हे जगातील सार्वकालिक सर्वश्रेष्ठ फलंदाज – ब्रायन लारा

लंडन:  सर विवियन रिचर्ड आणि सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटच्या जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज समजले जाते. ब्रायन लारा यालाही त्यांच्या बरोबरीने स्थान आहे. मात्र, खुद्द लारा याच्यामते  वेस्ट इंडीजचे महान फलंदाज कार्ल हुपर हे जगातील सार्वकालिक सर्वश्रेष्ठ फलंदाज आहेत. मी किंवा सचिन यांची फलंदाजीची गुणवत्ता कार्ल हुपर यांच्या गुणवत्तेच्या जवळपासही पोहोचू शकत नाही, असे लारा यांचे मत आहे. 

लारा यांनी आपल्या ‘द इंग्लंड क्रोनिकल्स’ या पुस्तकात हुपर यांचा सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून उल्लेख केला आहे. लारा यांचे हे विधान समाज माध्यमातही मोठ्या प्रमाणावर बघितले जात आहे. त्याचप्रमाणे त्यावर क्रिकेट प्रेमींकडून प्रतिक्रिया ही व्यक्त केल्या जात आहेत. 

ब्रायन लारा हे वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघाचे कर्णधार आणि फलंदाज होते त्यांनी वेस्ट इंडिज संघाकडून 102 कसोटी सामने तर 227 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीमध्ये 13 शतके आणि 27 अर्ध शतकांसह 5 हजार 762 धावा केल्या तर एकदिवसीय सामन्यात सात शतके आणि 29 अर्धशतके यासह 5 हजार 761 धावा केल्या. एकाच डावात 400 धावांची खेळी खेळणारे लारा हे क्रिकेट विश्वातील एकमेव फलंदाज आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले विधान क्रिकेट शौकिनांसाठी धक्कादायक ठरले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading