Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

जोशी स्पोटर्स संघाला विजेतेपद !!

पुणे : क्रिकस्टार रायझिंग क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि २४ स्पोटर्स तर्फे आयोजित ‘कोद्रे फार्म्स मान्सुन करंडक’ खुला गट आंतरक्लब २५-२५ षटकांच्या स्पर्धेत कुणालसिंग चौहान याच्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर जोशी स्पोटर्स संघाने क्रिकस्टार रायझिंग क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा ५ गडी राखून पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
सिंहगड रोड येथील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकस्टार रायझिंग क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १७४ धावांचे आव्हान उभे केले. चांगल्या सुरूवातीनंतरही त्यांचा डावाची घसरण झाली. यश देशमुख याने ३२ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांसह ७२ धावांची स्फोटक खेळी केली. कर्णधार उदय म्हात्रे याने २७ धावांची खेळी केली. पण यानंतर संघाकडून कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकून खेळू शकला नाही. जोशी स्पोटर्सच्या शंतनु आठवले, कुणालसिंग चौहान आणि ओंकार मोगलगिद्दीकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

हे लक्ष्य जोशी स्पोटर्सने २२.५ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. विजेंद्र सिंग याने ५७ चेंडूमध्ये ८ चौकार आणि २ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. कुणालसिंग चौहान याने ५० चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ६६ धावांची खेळी केली. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी ८१ चेंडूत १०७ धावांची भागिदारी करून संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण कोद्रे फार्मचे संचालक निकीत कोद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक आणि २४ स्पोटर्चे संचालक उदय म्हात्रे, सहभागी संघांचे प्रशिक्षक आणि खेळाडू, पालक आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या जोशी स्पोटर्स संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आले.

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
क्रिकस्टार रायझिंग क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २४.३ षटकात १० गडी बाद १७४ धावा (यश देशमुख ७२ (३२, ६ चौकार, ७ षटकार), उदय म्हात्रे २७, शंतनु आठवले २-१९, कुणालसिंग चौहान २-४३, ओंकार मोगलगिद्दीकर २-२८) पराभूत वि. जोशी स्पोटर्सः २२.५ षटकात ५ गडी बाद १७५ धावा (विजेंद्र सिंग ७६ (५७, ८ चौकार, २ षटकार), कुणालसिंग चौहान ६६ (५०, ६ चौकार, ४ षटकार), कुलदीप नायडु २-२८, प्रतिक डोलारे २-१७);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी कुणालसिंग आणि विजेंद्र यांच्यामध्ये १०७ (८१); सामनावीरः कुणालसिंग चौहान;

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः सम्यक शहा (ईलिट ईगल्स्, ३५० धावा, २० विकेट);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः स्वयम यादव (पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ३८५ धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः आर्य कुमावत (ईलिट ईगल्स्, २० विकेट);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading