Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

वंडरफुल मिलेट्स: पौष्टिक फायदे समजून घेणे या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

पुणे : भरडधान्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्यातर्फे वंडरफुल मिलेट्स: पौष्टिक फायदे समजून घेणे या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी यांच्या शुभहस्ते झाले. विभागप्रमुख प्रा.अल्ताफहुसेन नदाफ यांनी भरडधान्यांचे महत्त्व सांगितले. डॉ. कोतकर यांनी भरडधान्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या (सीएमआरटी) उपक्रमांची ओळख करून दिली. डॉ. हेमलता कोतकर आणि प्रा. संजय औटी यांनी संपादित केलेल्या ‘मिलेट्स: पारंपारीक धान्य आणि निरामय आरोग्य’ या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमादरम्यान करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पुस्तकासाठी योगदान देणाऱ्या लेखकांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रा. मिलिंद सरदेसाईनी केले.
 बायफ संस्थेचे  संजय पाटील,  महेश लोंढे, डॉ.संतोष सुर्यवंशी आणि प्रा.संजय औटी यांनी भरडधान्यांची विविध स्थानिक वाणे आणि त्यांची पौष्टिक विविधता, आंत्रप्रुनरशिप, औषधी उपयोग इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. कु. चंद्रिका पॉल आणि कु. भाग्यश्री कासार यांनी भरडधान्यांनवर आधारित पाककृतींचे प्रात्यक्षिक दाखवले. कार्यक्रमादरम्यान भरडधान्य आणि उत्पादनांचेही प्रदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच पुणे शहर परिसरातील अनेक नागरिकही उपिस्थत होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading