झिप इलेक्ट्रिक दुचाकी डिलिव्हरी सहयोगींनी मिळवले विक्रमी उत्पन्न
मुंबई : झिप इलेक्ट्रिक या भारतातील आघाडीच्या टेक-सक्षम ईव्ही-अॅज-ए-सर्विस प्लॅटफॉर्मने त्यांच्या गिग कर्मचारीवर्गाच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. उत्पन्नामधील या वाढीमधून झिप इलेक्ट्रिकची शाश्वत व आकर्षक उत्पन्न संधींच्या माध्यमातून त्यांच्या डिलिव्हरी सहयोगींना सक्षम करण्याप्रती, तसेच त्यांचा राहणीमान दर्जा उंचावण्याप्रती कटिबद्धता दिसून येते.

झिप पायलट्सचे, प्रामुख्याने ईव्ही राइडर्सचे सरासरी वय २७ वर्ष आहे. या उल्लेखनीय यशामध्ये त्यांचे ८ टक्के पायलट्स आता प्रतिमहिना ५०,००० रूपयांहून अधिक कमावतात, ज्यामध्ये मार्चपासून ५० टक्के वाढ झाली आहे. तसेच, १४ टक्के झिप पायलट्सचे मासिक उत्पन्न ४०,००० रूपयांवरून ५०,००० रूपयांपर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामध्ये मार्च’२४ मधील मागील उत्पन्नाच्या तुलनेत ८१ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण, ३५ टक्के झिप पायलट्स प्रतिमहिना २४,००० रूपयांहून अधिक कमावत आहेत, ज्यामधून झिपच्या समर्पित कर्मचारीवर्गाच्या उत्पन्नामध्ये सतत वाढ दिसण्यात येत आहे.
झिपच्या तीन-चाकी पायट्सच्या उत्पन्नांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ५ टक्के तीन-चाकी पायलट्सचे मासिक उत्पन्न ८०,००० रूपयांपेक्षा जास्त आहे, तर ३० टक्के पायलट्सचे मासिक उत्पन्न ५०,००० रूपयांपेक्षा जास्त आहे. या आकडेवारींमधून झिप इलेक्ट्रिकची आपल्या ईव्ही कार्यसंचालनांच्या वैविध्यपूर्ण ताफ्यामध्ये उत्पन्न क्षमता वाढवण्याप्रती यशस्वी प्रयत्न दिसून येतात.
आर्थिक फायद्यांव्यतिरिक्त, झिप इलेक्ट्रिक आपल्या डिलिव्हरी सहयोगींना इन्सेंटिव्ह्ज देते. ० ते ३ महिने सेवा दिलेल्या पायलट्सना सर्वोत्तम उत्पन्न संधीसह विमा दिला जातो. ३ ते ६ महिने सेवा दिलेल्या पायलट्सना गूडीज आणि सेवांवर अतिरिक्त सूट मिळते. ६ ते ९ महिन्यांच्या सेवा टप्प्यावर पोहोचल्यानंतर ते गोल्ड कॅटेगरी प्रीव्हीलेजेस्, मूव्ही तिकिटे, कुटुंबियांचा विमा आणि झिप-सत्यापित ऑन-डिमांड राइड्ससाठी पात्र ठरतात. १२ महिने सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना स्पेशल हेलमेट्स, संस्थापंकांसोबत डिनर, मूव्ही तिकिटे, इंटर्नल जॉब पोस्टिंग (आयजेपी) आणि इतर विशेष फायदे यांसारख्या पर्यायांसह सन्मानित करण्यात येते. ते प्लॅटफॉर्मवर अधिक काळ सेवा देत राहिल्यास फायद्यांमध्ये वाढ होते.
झिप इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्ता म्हणाले, ”झिपची निर्मिती करण्यामधून आम्हाला मिळालेले मोठे समाधान म्हणजे आम्ही आमच्या २५,००० हून अधिक सक्रिय डिलिव्हरी पायलट्सना सक्षम करत आहोत, जे झिप प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कमावत आहेत. आम्हाला आमच्या पायलट्सच्या उत्पन्नांमध्ये झालेली मोठी वाढ पाहून आनंद होत आहे. यामधून डिलिव्हरी सहयोगींकडून इलेक्ट्रिक वेईकल्सचा अधिक प्रमाणात अवलंब दिसून येण्यासोबत शाश्वत व लाभदायी उत्पन्न संधी देण्याप्रती आमची कटिबद्धता निदर्शनास येते. आमचे पायलट्स आमच्या कार्यसंचालनांचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांचे यश त्यांची अथक मेहनत, तसेच हरित व अधिक संपन्न भविष्याप्रती आमच्या संयुक्त दृष्टिकोनामधून दिसून येते.”
