Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Weather Update : पुणे, साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट, अतीमुसळधार पावसाची शक्यता  

पुणे :  मागील 24 तासांपासून मुंबईसह महानगर परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात आज पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये पुणे, सातारा, मुंबई या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री पासून कोकण, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई आदी ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.  तर  पुढील पाच दिवसांसाठी राज्यामध्ये विविध जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

https://x.com/Hosalikar_KS/status/1810294350057709771

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading