नवीन मराठी शाळेत संस्कृतदिन साजरा
पुणे : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन्यातील पहिला दिवस, महाकवी कालिदास दिन म्हणजेच संस्कृत दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. गणपतीच्या पृथ्वी प्रदक्षिणेच्या कथेचे संस्कृत मधून नाटक, संस्कृत कोडी सोडवणे, गाणी व श्लोक पठण असे कार्यक्रम आयोजित केले होते. शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र जोग, मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा पाखरे, योगिता भावकर, तनुजा तिकोने,धनंजय तळपे, स्वाती यादव, मीनल कचरे यांनी संयोजन केले.
