Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

कराच्या फायलिंगमध्ये क्रांती: मायआयटीरिटर्न आणत आहे भारतातील अशा प्रकारचे पहिलेच मोबाइल अॅप

 www.myITreturn.com मागील नवोन्मेषाची शक्ती समजल्‍या जाणाया स्कोरीडोव्ह सर्व चाकोऱ्या मोडणाऱ्या आपल्या नवीन मोबाइल अॅपची घोषणा केली आहे. भारतीयांना आयकर विवरणपत्रे फाइल करणे सुलभ व्हावेत्या प्रक्रियेत क्रांती घडावी या हेतूने हे मोबाइल अॅप डिझाइन करण्यात आले आहे. हे नवोन्मेषकारी अॅप भारतातील अशा प्रकारचे पहिलेच आहे. वापरकर्त्यांना थेट स्मार्टफोन्सच्या माध्यमातून कर फाइल करण्याची मुभा या अॅपमुळे मिळाली आहे. त्यासाठी त्यांना कोणतीही प्रत्यक्ष कागदपत्रे अपलोड करण्याची गरज भासणार नाहीएकंदर प्रक्रिया शिस्तबद्ध होईल आणि कराचे फायलिंग आजवर कधीच नव्हते एवढे झटपट व कार्यक्षम होईल. 

कराच्या फायलिंगमधील ‘गेम-चेंजर

मायआयटीरिटर्न (myITreturn) अॅप कराची विवरणपत्रे फाइल करण्याच्या पद्धतीत कायापालट घडवून आणत आहे. मायरिटर्नअॅप ग्राहकांच्या गरजांचा विचार करून डिझाइन करण्यात आले आहेयात कागदपत्रांची कटकट नाही आणि यामुळे कराचे फायलिंग सगळेजण करू शकतील. स्मार्टफोनवर काही टॅप्सच्या माध्यमातून आपण घरात किंवा ऑफिसमध्ये बसून कराचे विवरणपत्र भरू शकतो. या वापरातील सुलभतेमुळेच मायआयटीरिटर्न अॅप या क्षेत्रातील खराखुरा गेम-चेंजर ठरत आहे. 

स्कोरीडोव्हचे संस्थापक साकार यादव या अॅपबद्दल उत्साह व्यक्त करत म्हणाले, “हे कायापालट घडवणारे अॅप भारतात सर्वांपुढे आणताना आम्हाला खूपच आनंद होत आहे. मायआयटीरिटर्नच्या माध्यमातून कराचे फायलिंग सुलभसुरक्षित व कार्यक्षम करणे हेच आमचे उद्दिष्ट कायम राहिले आहे. हे अॅप या उद्दिष्टाचीच पावती आहे. संपूर्ण प्रक्रियेचे सुलभीकरण करणारे अनन्यसाधारण उत्पादन यामध्ये दिले गेले आहे. त्याचबरोबर वापरकर्त्याचा डेटा सुरक्षित राहील याची खात्री करण्यात आली आहे आणि त्यांना जास्तीतजास्त परतावाही दिला जातो. हे अॅप येत्या काही दिवसात भारतीयांचा कराच्या फायलिंगप्रती असलेला दृष्टिकोन मलभूतरित्या बदलून टाकेल असा विश्वास आम्हाला वाटतो.

परवडण्याजोगे कर फायलिंग केवळ ९९ रुपयांमध्ये! 

या अॅपचे निर्माते स्कोरीडोव्ह सांगतात कीसर्वांना दर्जेदार करसेवा परवडण्याजोग्या दरात पुरवण्यासाठी ते बांधील आहेत. म्हणूनच ते या अॅपद्वारे केवळ ९९ रुपयांत कर फायलिंग सेवा देऊ करत आहेत. या उपक्रमामुळे करदात्यांवरील अनावश्यक आर्थिक भार कमी होणार आहे आणि त्यांना उच्च दर्जाची सेवाही मिळणार आहे. 

अद्वितीय कौशल्य व विश्वास

कराचे फायलिंग सुलभ व तणावमुक्त करण्याच्या दृष्टीने मायआयटीरिटर्न अगदी सुरुवातीपासूनच समर्पित आहे. ई-फायलिंगमधील आद्य वेबसाइट असलेल्या मायआयटीरिटर्नने अचूकताकार्यक्षमता व सर्व सरकारी नियमांची पूर्तता यांची निश्चिती करणारा ठोस प्लॅटफॉर्म उभा केला आहे. myITreturn (स्कोरीडोव्ह) या प्लॅटफॉर्मला भारताच्या आयकर विभागाने अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे व्यक्तिगत व आर्थिक माहिती सुरक्षित राहील आणि अत्यंत काळजीपूर्वक हाताळली जाईल याबद्दल खात्री बाळगता येते. 

मायआयटीरिटर्न अॅपमधील महत्त्वाच्या सुविधा

हे अॅप अविश्वसनीयरित्या यूजर-फ्रेण्डली आहे आणि वापरकर्त्याला (यूजर) प्रत्येक पायरीवर स्पष्टअनुकरणास सोप्या अशा सूचनांच्या माध्यमातून मार्गदर्शन करते. कर भरणारी व्यक्ती वेतनदार कर्मचारी असो किंवा स्वयंरोजगारितत्यांना ही प्रक्रिया सरळ आणि सहज पूर्ण करण्याजोगी वाटेल. 

यातील सर्वांत मोठा लाभ म्हणजे करदात्याला आता अनेक प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही. हे अॅप आवश्यक ती सर्व माहिती सरकारी डेटाबेसेसमधून थेट सुरक्षितपणे प्राप्त करतेत्यामुळे कराच्या फायलिंगची प्रक्रिया खरोखर पेपरलेस (कागदविरहित) होते आणि अमूल्य असा वेळ व कष्ट वाचतात. 

प्रत्येक करदात्याला तो पात्र असलेला एक एक पैसा मिळावा म्हणून सर्व पात्र वजावटी आणि सवलतींचे मूल्यमापन करण्यासाठी मायआयटीरिटर्न बॅकएण्डला अविश्रांत काम करते. ज्या व्यक्तींना त्यांना उपलब्ध असलेल्या सर्व कर लाभांची माहिती नसतेत्यांच्यासाठी ही सुविधा विशेषत्वाने लाभदायी आहे. फॉर्म-१६चे तपशील मागवले जाणेसमभाग (भांडवली नफा)व्यक्तिगत व आर्थिक माहिती सुरक्षित ठेवणारे प्रगत इनक्रिप्शन तंत्रज्ञान आणि अशा अनेकविध सेवा हे अॅप देऊ करते. मलभूत आयकर विवरणपत्रांपासून ते अधिक जटील फायलिंग्जपर्यंत करदात्यांच्या वेगवेगळ्या करविषयक आवश्यकतांची पूर्तता करणाऱ्या अनेक सुविधा या अॅपमध्ये आहेत. 

ग्राहकांची शिफारस

कराचे फायलिंग करणे हे फारच भयावह काम आहे पण मायआयटीरिटर्न अॅपने हे काम अविश्वसनीयरित्या सोपे व परवडण्याजोगे झाले आहे. हा प्लॅटफॉर्म यूजर-फ्रेण्डली आहे आणि सहाय्यकारी टीम नेहमीच मदतीसाठी तत्पर असते.” – मुकेश रे

एका छोट्या व्यवसायाचा मालक आणि स्वयंरोगारित व्यक्ती म्हणून मायआयटीरिटर्नच्या कार्यक्षमतेचे व किफायतशीरतेचे मी कौतुक करतो. त्यांच्या सेवांमुळे माझा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले आहेत.” – गौतम कुमार

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading