Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

“लहानपणी कुस्तीमध्ये मला २१ रुपैयेच बक्षीस मिळाले होते” – हृषिकेश शेलार

तुला शिकवीन चांगलाच धडा  मध्ये हल्लीच कुस्तीचा एक सीन दाखवला गेला. भुवनेश्वरीने अधिपती आणि अक्षराला १० दिवसांचे आव्हान दिले होते. घराबाहेर राहून दोघांना सिद्ध करून दाखवायचे होते की ते आपल्या संसाराची जबाबदारी घेण्यास सक्षम आहेत. अधिपती-अक्षराच्या ह्या कसोटीत खूप आव्हान ही येतात जिथे कुस्तीमध्ये जिंकलेले पैसे दुर्गेश्वरी-चंचला चोरतात, भुवनेश्वरी अक्षरा अधिपती ज्या काकांच्या घरात राहतात त्या काकांना दोघांकडून घराचं १० हजार भाडं वसूल करायला लावते.  पण सगळी आव्हान  पूर्ण करुन ते दोघे घरी येतात. घरात सगळे त्यांचं गोड कौतुक, स्वागत करतात.

कुस्तीच्या सीनसाठी केलेली मेहनत आणि त्याचा अनुभवाबाबत हृषिकेश शेलारने सांगितले, “कुस्तीचा अनुभव खूप छान होता. सलग ३ दिवस शूट करत होतो थकलो होतो तरी ही जेव्हा तो सीन शूट करून झाल्यावर छान वाटलं. मानसिकरित्या काटक झालो आणि शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे ह्याची पुन्हा आठवण करून दिली ह्या सीनने. मला आनंद आहेत कि मी यशस्वीपणाने कुस्ती सीन करू शकलो. मला फारसं  कुस्तीच ज्ञान नाही पण एकदा लहानपाणी गावाकडे असताना मी कुस्ती खेळलो होतो आणि त्यात मला २१ रुपैयेच बक्षीस मिळाले होते.  कुस्तीचे डाव किंवा तालिमीत मी शिकलो नाही.

मी व्यायाम नियमित पणे अनेक वर्ष करत आहे मग ते घरी असो, किंवा व्यायामशाळेत. व्यायामाची मला आवड आहे  आणि त्याचा मला इथे फायदा झाला आहे. सीनसाठी सेट वरती जे तालिमीतली  लोक आले होते मी त्याच्याकडून काही डाव शिकलो आणि त्याचा उपयोग मी सीन मध्ये तिथल्यातिथेच त्याचा वापर करायचो. माझा एकद ऍक्सीडेन्ट मध्ये पायाचा  लिगामेंट टियर झाला होता काही वर्षां पूर्वी तर त्याची काळजी घ्यावी लागत होती. हा सीन करण्यासाठी फक्त माझी एकट्याची मेहनत नाही पूर्ण टीम मुळे हा सीन अजून उत्तम पणे झाला.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading