फेनेस्टातर्फे पुण्यात आपल्या रिटेल कार्याचा विस्तार
पुणे: भारतातील सर्वात मोठा विंडोज आणि डोअर ब्रँड आणि या विभागातील बाजारपेठेतील अग्रणी फेनेस्टाने आणखी एक शोरूम सुरू करत आपल्या रिटेल विस्ताराला बळकटी दिली आहे. शांती सेल्स ही वैशिष्ट्यपूर्ण शोरूम शॉप नंबर ५, शंकेश्वरम प्लाझा, गंगाधाम शत्रुंजय टेंपल रोड, प्राइड हॉस्पिटलच्या मागे, सर्व्हे क्र. 65/A/2/7, 65/B/2/10, कोंढवा बुद्रुक, पुणे ४११०४८ येथे आहे. सर्वोत्तम प्रकारचे ॲल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे, uPVC खिडक्या आणि दरवाजे आणि सॉलिड पॅनेल दरवाजे या शोरूममध्ये आहेत.
या प्रसंगी बोलताना फेनेस्टाचे व्यवसाय प्रमुख श्री. साकेत जैन म्हणाले, “आमच्या वाढीच्या केंद्रस्थानी सर्वसाधारणपेक्षा पलीकडे जाऊन अतुलनीय ग्राहक अनुभव देत विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करणाऱ्या उत्पादनांच्या वैविध्यपूर्ण श्रेणी तयार करण्याची बांधिलकी आहे. पुण्याच्या रिटेल परिक्षेत्रामध्ये आमचा धोरणात्मक विस्तार ही या मूळ तत्वज्ञानाची पावती आहे. आमच्या भागीदारांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे याला बळकटी मिळाली आहे. आमच्या शोरूमची रचना, डिझाईन अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे की येथे येऊन ग्राहकांना एक्सप्लोर करण्यास मदत मिळू शकते, आमच्या योजनांचा ते येथे खोलवर विचार करतात आणि त्यांच्या आकांक्षांशी सुसंगत निर्णय घेतात. अलिकडे करण्यात आलेला विस्तार हा आमच्या प्रयत्नांमधील एक मैलाचा दगड आहे. आमचा आतापर्यंतचा प्रवास ज्या ग्राहक-केंद्रित दृष्टीकोनाने परिभाषित केला आहे त्याबाबत स्थिर, कायम राहून आमची पोहोच वाढवण्याचा विचारपूर्वक प्रयत्न केला आहे.”
या सादरीकरणासह आमच्या सध्याच्या आणि संभाव्य ग्राहकांसाठी परस्परसंवादी आणि माहितीपूर्ण खरेदीचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी फेनेस्टाने आणखी एक महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. फेनेस्टा शोरूम्स ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि बाजारपेठेतील अग्रणी म्हणून स्थान मिळवण्यात यशस्वीरित्या योगदान देत आहेत. भारतात ॲल्युमिनियमच्या खिडक्या आणि दरवाजे, uPVC विंडो आणि डोअर आणि सॉलिड पॅनल डोअर्स श्रेणींमध्ये झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे, ब्रँड आपला बाजारातील हिस्सा आणखी वाढवण्याचा आणि भविष्यात आपले नेतृत्व स्थान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
ते पुढे म्हणाले की, “आमच्या भागीदार आणि ग्राहकांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे, आम्ही आत्तापर्यंतचा एक चांगला प्रवास केला आहे आणि पुढे जाऊन आणखी महत्त्वपूर्ण कामगिरी आम्हाला करायची आहे. मला विश्वास आहे की आमची विस्तृत उत्पादन लाइन, बाजारपेठेविषयी काटेकोर जागरूकता आणि टियर 2 आणि टियर 3 बाजारपेठेवर असलेलं विशेष लक्ष आम्हाला आमच्या निरंतर प्रगतीमध्ये मदत करतात आमच्या रिटेल विस्ताराचा प्रत्येक पैलू आमच्या ग्राहकांना मोहित करण्यासाठी, शिक्षित करण्यासाठी आणि आयुष्यभराच्या आठवणीसाठी तयार करण्यात आला आहे.”
शांती सेल्स ही फेनेस्टा शोरूम शॉप नंबर 5, शंकेश्वरम प्लाझा, गंगाधाम – शत्रुंजय टेंपल रोड, प्राईड हॉस्पिटलच्या खाली सर्व्हे क्र –65/A/2/7, 65/B/2/10 कोंढवा बुद्रुक, पुणे 411048 येथे आहे. विविध डिझाइन आणि रंगांमध्ये खिडक्या, दरवाजे यांची उत्पादन श्रेणी येथे सादर करण्यात आली आहे. या शोरूम सह फेनेस्टा आहे आता ९०० ठिकाणी सेवा देत आहे.
फेनेस्टा ही भारतातील एकमेव कंपनी आहे जी uPVC बनवण्यापासून सुरू होणारी संपूर्ण पुरवठा साखळी नियंत्रित करते. प्रोफाइल बनवणे, अंतिम उत्पादन बसवणे तसेच विक्रीनंतरची सेवा देणे या सगळ्या गोष्टी केल्या जातात. ग्राहकांना चांगल्या प्रकारची अभियांत्रिकी असलेली पण समकालीन शैली डिझाईन देण्यासाठी खास यूके आणि ऑस्ट्रियामध्ये डिझाइन केलेली उत्पादनांची श्रेणी आहे.
भारतातील वैविध्यपूर्ण आणि अत्यंत तीव्र हवामानात व्यवस्थित कामगिरी करू शकतील हे सुनिश्चित करत फेनेस्टा मधील उत्पादने प्रत्येक टप्प्यावर कठोर चाचण्या आणि गुणवत्ता तपासणीमधून जातात. सौंदर्यशास्त्राशी तडजोड न करता ध्वनी रोधक, पाऊस रोधक आणि डस्ट प्रूफ वैशिष्ट्यांसाठी फेनेस्टा उत्पादने देशभरातील आघाडीचे बिल्डर्स, वास्तुविशारद आणि इंटिरिअर डिझायनर यांच्या मध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.
