डाॅ. दुधभाते नेत्रालयातर्फे वारकऱ्यांची नेत्रतपासणी
पुणे: सावळया विठाेबाला डोळे भरून वारक-यांना पाहता यावे त्यासाठी त्यांचे डोळे सुस्थितीत राहावेत यासाठी त्यांना मोफत नेत्रचिकित्सा सेवा सिंहगड रस्त्यावरील डॉ. दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर यांच्यातर्फे दिली गेली. ही सेवा दरवर्षी दिली जाते. दि. २९ व ३० जून रोजी आळंदी, १ जुलै रोजी माणिक बाग व मार्केट यार्ड येथे, २ जुलै रोजी दिवेघाट येथे, ३ जुलै रोजी उरळी कांचन या वारीच्या मार्गावर रुग्णालयाच्या फिरत्या दवाखान्यात म्हणजे नेत्र वैद्यकीय सुसज्ज व्हॅन मध्ये मोफत डोळे तपासणी केली गेली. यामध्ये डोळ्यांचे जुजबी आजार चष्म्याचा नंबर याचे वाटप करण्यात आले.
डॉ. दुधभाते नेत्रालयातील डॉ. स्नेहल मानपुत्र, सुरेश शर्मा, सारिका भोसले, वरदा कुलकर्णी, वैष्णवी देशमुख, रोहन चौगुले, अंकित शुक्ला, मंगेश दरेकर, निकिता भंडारी, अनुराधा कुटे, तन्मय करंजकर, किसन सोनवणे ह्या सर्व कर्मचाऱ्यांचे या नेत्रचिकित्सा शिबिरात मोठे योगदान आहे. या सर्व महत्वाच्या दिवशी आरटीओ चे वरिष्ठ अधिकारी श्रीमती अर्चना पाटील, अमर देसाई, आणि युवराज पाटील हे सर्व उपस्थित होते. अश्या प्रकारच्या वारकरी रुग्णसेवेचे डॉ. दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचे हे ११ वे वर्ष आहे. आणि पुढची अनेक वर्ष हि सेवा अव्याहतपणे अशीच चालू राहावी असा रुग्णालयाचा मानस आहे.
