एअर कूलर विभागातील अग्रणी केनस्टारकडून मोठे अप्लायन्सेस लाँच
गुरगाव : केनस्टारने प्रतिष्ठित हयात मानेसर येथे त्यांच्या अॅन्युअल बिझनेस मीटचे आयोजन केले, जेथे दिवसभर चाललेले सेलिब्रेशन, सहयोग आणि भावी नियोजनासाठी १००० हून अधिक सहयोगी एकत्र आले.
बीवाय (व्यावसायिक वर्ष) २०२३-२४ मध्ये विक्रमी कामगिरी
व्यावसायिक वर्ष २०२३-२४ केनस्टारसाठी मोठा टप्पा ठरला, जेथे कंपनीने प्रभावी ५५ टक्के वाढीसह उल्लेखनीय १३० टक्के लक्ष्य संपादित केले.
आपल्या प्रमुख भाषणामध्ये केनस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. सुनिल जैन यांनी केनस्टारच्या प्रादेशिक व जागतिक यशस्वी कामगिरीवर प्रकाश टाकला:
”संपूर्ण दक्षिण प्रांतामध्ये अग्रस्थानी राहत आम्ही कर्नाटकमध्ये आमचे पहिल्या क्रमांकाचे स्थान कायम राखले आहे. ओरिसा व पश्चिम बंगालमधील स्थान प्रबळ करत आमचे प्रभुत्व पूर्व प पश्चिमी बाजारपेठांमध्ये कायम आहे. उत्तरेकडे मोठ्या कूलर्ससाठी मागणी वाढत आहे. या विभागामध्ये अग्रणी बनण्याच्या आमच्या प्रवासाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या यशस्वी कामगिरीसह आम्ही देशातील पहिल्या क्रमांकाचा एअर कूलर ब्रँड बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.
आम्ही आजच्या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता केली आहे. आम्ही आमचा ऑनलाइन ई-कॉमर्स आणि मोठ्या स्वरूपातील सहयोग प्रवास सुरू केला. काही वर्षांमध्येच आम्ही ई-कॉमर्स व मोठ्या स्वरूपाच्या चॅनेल्सवर देशातील झपाट्याने विकसित होणारा ब्रँड बनलो आहोत.
आमचे यश भारताबाहेर देखील दिसून येते, जेथे ३० हून अधिक देशांमध्ये आमची उपस्थिती आहे. आम्ही सार्क, मिडल ईस्ट व आफ्रिका प्रांतांमध्ये अग्रस्थानी आहोत.”
केनस्टारचे ब्रँड अॅम्बेसेडर्स राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली, तसेच त्यांनी याप्रसंगी त्यांच्या स्टार प्रसिद्धीची भर करत केनस्टारच्या मोठ्या अप्लायन्सेसच्या नवीन श्रेणीचे अनावरण केले.
केनस्टारने मोठ्या अप्लायन्सेसची सर्वसमावेशक श्रेणी लाँच केली, ज्यामध्ये डबल-डोअर फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटर्स, स्प्लिट एअर कंडिशनर्स आणि फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्सचा समावेश आहे. या लाँचसह केनस्टार आता होम अप्लायन्सेसचा फुल स्टॅक प्रदान करते, ज्यामुळे ब्रँडची नाविन्यता व ग्राहक समाधानाप्रती कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.
मोठे अप्लायन्सेस विभागामध्ये विस्तार करण्याव्यतिरिक्त केनस्टारने अॅन्युअल मीटमध्ये नवीन बीएलडीसी कूलर मॉडेल्स लाँच करत ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञान प्रदान करण्याप्रती कटिबद्धता देखील दाखवली. या प्रगतीमधून केनस्टारची ऊर्जा-कार्यक्षम व उच्च-कार्यक्षम उत्पादने प्रदान करण्याप्रती समर्पितता दिसून येते.
केनस्टारने एअर कूलर्स, स्मॉल होम अप्लायन्सेस आणि वॉटर हीटर्स अशा त्यांच्या मुलभूत श्रेणींवर देखील मुख्यत्वे लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने या श्रेणींमधील आपल्या एसकेयूंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे, जेथे फक्त स्मॉल होम अप्लायन्सेसमध्ये १०० हून अधिक एसकेयू आहेत.
