Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

ICICI बँकेने भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट सॅफिरो फॉरेक्स कार्ड लाँच केले आहे

मुंबई: आयसीआयसीआय बँकेने ‘स्टुडंट सॅफिरो फॉरेक्स कार्ड’ लाँच करण्याची घोषणा आज केली. हे प्रीमियम फॉरेक्स प्रीपेड कार्ड खास करून उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. व्हिसाचे पाठबळ मिळालेले हे कार्ड विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना प्रवेश शुल्क, अभ्यासक्रमाशी संबंधित शुल्क या शिक्षणाशी संबंधित खर्चासह प्रवास, जेवण आणि किराणा सामानासह परदेशातील इतर दैनंदिन खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष सेवा आणि सुविधा देतील.

बँकेकडून कोणतेही क्रॉस-चलन मार्क-अप शुल्क न आकारता हे कार्ड 15 चलनांमध्ये लोडिंग आणि व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य देते. ज्या विद्यार्थ्यांनी कार्डवर एकच चलन लोड केले आहे, त्यांनाही जगभरात प्रवास करणे शक्य होते. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा देण्यात आली आहे.

ICICI बँक स्टुडंट सॅफिरो फॉरेक्स कार्डची सुविधा घेतल्याबद्दल 15,000 रु. पर्यंतचे फायदे आणि अन्य विशेषाधिकार मिळतात. या कार्डासह एक वेलकम किट येते – यात एक प्राथमिक आणि एक बदली कार्ड येते. हे बदली कार्ड iMobile Pay, इंटरनेट बँकिंगद्वारे किंवा प्राथमिक कार्ड हरवल्यास/नुकसान झाल्यास बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून डिजिटल पद्धतीने सक्रिय केले जाऊ शकते. बँकेने ऑफर केलेल्या इतर कोणत्याही फॉरेक्स कार्डप्रमाणे हे कार्ड iMobile Pay आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करून विद्यार्थी आणि त्यांचे पालक त्वरित, कधीही आणि कोठूनही डिजिटल रिलोड करू शकतात. या कार्डसह, बँकेकडे परदेशात प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फॉरेक्स कार्डचा संच आहे.

लॉन्च प्रसंगी बोलताना,   निरज त्रालशावाला, हेड- पेमेंट सोल्युशन्स, ICICI बँक म्हणाले, “शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक लाभांसह नवीन प्रीमियम फॉरेक्स कार्डची सुविधा देताना आम्हाला आनंद होत आहे. हे विद्यार्थ्यांना अभ्यास शुल्क, दैनंदिन खर्च आणि पालकांकडून कार्डचे डिजिटल री-लोडिंग तसेच अतिरिक्त क्युरेटेड फायदे यांचा तिहेरी फायदा देते. आम्हाला विश्वास आहे की हे कार्ड विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना परदेशात पेमेंट्सचा त्रासमुक्त आणि अत्यंत सोयीचा अनुभव देईल.”

व्हिसा इंडियाचे कंट्री मॅनेजर  सुजय रैना म्हणाले, “ICICI बँकेसोबत भागीदारी करत स्टुडंट सॅफिरो फॉरेक्स कार्ड लाँच करताना व्हिसाला आनंद होत आहे.  शिक्षणासाठी परदेशाची निवड करणाऱ्या वाढत्या विद्यार्थी वर्गासाठी हे तयार करण्यात आले आहे. अभ्यास करत असताना, ते शिकवणी, प्रवास, जेवण आणि किराणा सामानासह अनेक खर्चाच्या व्यवस्थापनासाठी हे कार्ड सोयीस्करपणे वापरू शकतात. परदेशातील जीवनाच्या गरजेनुसार कार्ड वैशिष्ट्ये तयार करून, हे व्हिसा कार्ड विनानिर्बंध, सुरक्षित व्यवहार, संपूर्ण वापर सुलभता आणि जागतिक स्वीकृती सुनिश्चित करते. हे सर्वसमावेशक आर्थिक समाधान आजच्या विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करतात आणि ते चिंतामुक्त होतात. जेणेकरून त्यांना परदेशात अभ्यासाचा उत्तम अनुभव घेता येईल.”

कार्डाचे मुख्य फायदे :

सहभागी होण्याचे फायदे

  • USD 99 किमतीचे दोन विनामूल्य आंतरराष्ट्रीय लाउंजमध्ये जगभरात विनामूल्य प्रवेश
  • विनामूल्य आंतरराष्ट्रीय सिम कार्ड मिळवा
  • INR 1,000 किमतीचे मोफत Uber व्हाउचर
  • INR 999 किमतीचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ओळखपत्र (ISIC) सदस्यत्व – ISIC हा 130 देशांमध्ये पूर्णवेळ विद्यार्थी स्थितीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलेला पुरावा आहे
  • हरवलेले कार्ड/काउंटर कार्ड विम्यासह INR 5 लाखांपर्यंतचे कॉम्प्लिमेंटरी कार्ड प्रोटेक्शन प्लस योजना
  • स्वागत किटमध्ये पासपोर्ट धारक, पुस्तिका आणि प्रवास चेकलिस्टचा समावेश होतो

इतर अनन्य विशेषाधिकार

  • पाच वर्षांसाठी रोख पैसे काढण्यावर तीन मासिक एटीएम शुल्क माफ
  • कोणत्याही क्रॉस-करन्सी व्यवहारावर कोणतेही मार्क-अप शुल्क नाही
  • ऑनलाइन चॅनेलद्वारे केलेल्या सर्व ऑनलाइन किराणा मालाच्या खरेदीवर आणि ट्रान्झिट बुकिंगवर 5% कॅशबॅक मिळवा

कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, ICICI बँकेचे ग्राहक येथे भेट देऊ शकतात: https://www.icicibank.com/personal-banking/cards/travel-card/student-sapphiro-forex-prepaid-card किंवा iMobile Pay: Cards & Forex > Forex Prepaid Cards >  Apply Now.

ICICI बँक त्यांच्या शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ICICI बँक स्टुडंट फॉरेक्स कार्ड आणि मल्टीकरन्सी फॉरेक्स कार्ड देखील देते.

*फायद्यांच्या रिवॉर्डवर अटी आणि शर्ती लागू होतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading