Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

पतित पावन संघटनेतर्फे राहुल गांधी यांच्या छायाचित्राचे दहन

 

पुणे : जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा… राहुल गांधी यांचा निषेध असो… अशा घोषणा देत पतित पावन संघटना, पुणे शहर तर्फे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांच्या छायाचित्राचे दहन देखील करण्यात आले. ‘स्वतःला हिंदू म्हणविणारे हिंसा करीत आहेत’, हे विधान राहुल गांधी यांनी सभागृहात केले होते.

थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील शनिपार चौकात झालेल्या निषेधाच्या प्रसंगी संघटनेचे पुणे शहराध्यक्ष स्वप्निल नाईक, संपर्कप्रमुख गुरु कोळी, व्यापारी आघाडी अध्यक्ष अक्षय जम्बुरे, शहर उपाध्यक्ष प्रसाद वाईकर, माथाडी अध्यक्ष रवी भांडवलकर, सह संपर्कप्रमुख महेश पाटोळे, अशोक परदेशी, स्वप्निल आंग्रे, राजाभाऊ राजपूत, नरसिंग कोळी, सौरभ पवार, राहुल शिंदे, राजाभाऊ कारकूड, योगेश शिर्के, रमेश शेतसंधी, बाबा मिसाळ, कार्तिक बनकर, सुनील लोणारे, सोमनाथ नाईक, भीमा कोळी, सोमेश कन्हैया, गौरव मेत्रे, गणेश राजोळे यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते.

पुणे शहराध्यक्ष स्वप्निल नाईक म्हणाले, स्वतः भारतामध्ये राहून हिंदू हिंसक आहेत, हे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांचा आम्ही निषेध करीत आहोत. भारताची संस्कृती व हिंदू धर्माविषयी संपूर्ण जग अभ्यास करीत आहे. त्या हिंदू धर्माचा राहुल गांधी यांनी अपमान केला आहे. त्यामुळे ते पुण्यात आले की काळे झेंडे दाखवून पतित पावन संघटना त्यांचा निश्चितच निषेध करेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading