Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

एसबीयुपीमध्ये आता मिळणार लिबरल आर्ट्सचे  शिक्षण

पुणे : व्यवस्थापन, विधी व संगणक शास्त्र विषयात उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी नावलौकिक असलेल्या श्री बालाजी विद्यापीठ, पुणे (एसबीयुपी) या संस्थेने यावर्षीपासून लिबरल आर्ट्स या विषयाचे प्रशिक्षण सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत बी. ए. लिबरल आर्ट्स व बी. ए. (ऑनर्स) सायकॉलॉजी  हे दोन पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती श्री बालाजी विद्यापीठाच्या आर्ट्स, ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेन विभागाच्या प्राचार्या व प्रसिद्ध लिबरल आर्टस तज्ज्ञ डॉ प्रीती जोशी यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना डॉ जोशी म्हणाल्या की, या दोन्ही पदवी अभ्यासक्रमांची रचना केंद्र सरकारच्या नवीन शैक्षिणिक धोरणानुसार (एनईपी २०२०) नुसार करण्यात आली असून भारतीय विद्या अर्थात इंडियन नॉलेज सिस्टम (आयकेएस)च्या घटकांचा यात समावेश करण्यात आला आहे. सदर अभ्यासक्रम शिकविताना कौशल्याधारित प्रशिक्षण, अनुभवातून शिक्षण व संशोधन या बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे.

बी. ए. लिबरल आर्टस अभ्यासक्रमाच्या मूळ उद्दिष्टांनुसार आंतरशाखीय दृष्टीकोन अवलंबिला जाण्याबरोबर विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय मेजर आणि मायनर तत्वानुसार निवडीचे स्वातंत्र्य असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना ओपन इलेक्टीव्ह पद्धतीने विविध विषयांची बास्केट उपलब्ध करून देण्यात येईल. अनुभवी शिक्षक, आऊट ऑफ क्लास लर्निंग, इंडस्ट्रीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या सारख्या अनेक वैशिष्ट्यांसह हा अभ्याक्रम राबवला जाईल, असे डॉ जोशी यांनी नमूद केले.

हे दोन्ही अभ्यासक्रम ४ वर्षांचे असून त्याला आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी २०२०) नुसार बाहेर पडण्याचे पर्याय उपलब्ध असतील. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ वी (कोणीतीही शाखा) कमीतकमी ५०% गुण असे आवश्यक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading