नऱ्हे येथे वृक्षारोपण अभियानाने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन
पुणे : राजमाता जिजाऊ यांच्या ३५१ व्या पुण्यतिथी निमित्त खडकवासला विधानसभा काँग्रेसच्या वतीने नऱ्हे येथील स्वर्गीय उत्तमराव पाटील जैव विविधता वन उद्यानात वृक्षारोपण अभियान राबवुन अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण अभियानास सुरूवात करण्यात आली.
अभियानात दुर्मिळ देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी खडकवासला विधानसभा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल मते पाटील, बारामती लोकसभा काँग्रेस कमिटी अध्यक्ष लहू अण्णा निवंगूने, उपाध्यक्ष सुरेश मते पाटील, पुणे जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष संजय रायकर, खडकवासला विधानसभा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संजय अभंग, विश्वजीत जाधव ,खडकवासला ओबीसी अध्यक्ष विशाल पवार, राजू गायकवाड ,प्रशांत भोसले, अक्षय जाधव, विजय गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
फोटो
