Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागवणारे शिक्षण देणे गरजेचे : डॉ. नितीन करीर

 

सरहद पब्लिक स्कूल येथे गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

पुणे  : विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागवणारे शिक्षण देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ. नितीन करीर राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी केले.
सरहद पब्लिक स्कूल पुणे येथे गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, उद्योजक सुधीर साबळे आणि शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. करीर म्हणाले, काश्मीर सारख्या अति संवेदनशील परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम सरहद संस्था करत आहे. लोकांना जोडण्याचे कार्य ही संस्था गेल्या 25 वर्षापासून करत आहे. संस्था उभी करणे सोपे असते परंतु संस्थेविषयी लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे हे देखील तितकेच आवश्यक असते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात देशप्रेम रुजवण्याचे काम सरहद संस्था सदैव करत राहील असे प्रतिपादन त्यांनी केले.
या प्रसंगी कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे म्हणाले, गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुरू केलेल्या अनेक संस्था या दीडशे वर्षांनंतरही यशस्वीरित्या सुरू आहेत आणि हा इतिहास आहे. आणि त्यांच्याच नावाने आज प्रबोधिनी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाले हा उत्तम योग आहे. प्रबोधिनीचे कार्य हे नेहमीच प्रबोधनाचे असते.
उद्योजक सुधीर साबळे यांनीही मनोगत व्यक्त केले आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरहद संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष संजय नहार यांनी केले. सूत्रसंचालन जाहीर भट यांनी केले. शैलेश वाडेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading